मेजरला रॅंकही सांगता येईना... नेमका कोण आहे तो? हेर की.. 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

रात्री भरदार शरीरयष्टी, पिळदार मिशा, जवळ कागदपत्रांची मोठी पुरचुंडी, अंगामध्ये लष्करी वर्दी असलेला एक व्यक्ती फिरत होती. लष्करात मोठे अधिकारी असल्याने प्रत्येकजण त्यांच्यासोबत अदबीत वागत होता. त्यांची भेट सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राजाराम गवळी यांच्यासोबत पडली.

नगर ः नगर शहरालगत भारतीय लष्कराची मोठी वसाहत आहे. या शिवाय एमआयआरसीसारखी महत्त्वाची ठिकाणेही नगर शहरालगत आहेत. जिल्ह्यात सैन्यात भरती होण्यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर नंतर सर्वाधिक तरूण सैन्यात भरती नशिब अजमावण्यासाठी जातात. माळीवाडा बसस्थानकात एक मेजर त्यांच्याशी लष्करी भाषेत एकजण संवाद साधत होता. 

मी आहे मेजर

रात्री भरदार शरीरयष्टी, पिळदार मिशा, जवळ कागदपत्रांची मोठी पुरचुंडी, अंगामध्ये लष्करी वर्दी असलेला एक व्यक्ती फिरत होती. लष्करात मोठे अधिकारी असल्याने प्रत्येकजण त्यांच्यासोबत अदबीत वागत होता. त्यांची भेट सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राजाराम गवळी यांच्यासोबत पडली. त्यांच्यासमोरही त्याने लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले. त्याला गवळी यांनी सैन्यासंदर्भातील काही प्रश्‍न विचारले. त्याला वर्दीबाबतही सांगता येईना. रॅंकही चुकीची सांगितली. त्यामुळे गवळी यांचा संशय बळावला. 

मग सरकारी पाहुणचार

त्यांनी या बाबत काही लष्करी अधिकारी व कोतवाली पोलिसांना महिती दिली. पोलिसांनी त्या मेजर साहेबांना काही प्रश्‍न विचारले. त्यांच्यासमोरही ते अनुत्तरीत झाले. मग मात्र पोलिसांनी त्यांना "सरकारी विश्रामगृहात' आणले. 

साहेब आहेत रत्नागिरीचे

या प्रकरणी सेवानिवृत्त लष्करी अधिकारी राजाराम कारभारी गवळी (रा. वाकोडी ता. नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या तोतया मेजरची पोलिसांनी आज कसून चौकशी सुरू केली. 
त्याचे नाव संजय विठोबा पाटील (रा. हातखंडा जि. रत्नागिरी) असे असल्याचे समजले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The rank could not even be described to the Major Ahmednagar