भाजप सत्तेत येण्याच्या धास्तीने विरोधक एकत्र : दानवे

danve
danve

सांगली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आल्यास पुढची 50 वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीने सर्व विरोधक एकत्र आल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी निवडणुकीस सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सांगलीत धनंजय गार्डन येते पंतप्रधान संवाद संघटन कार्यक्रमानिमित्त भाजपच्या बूथ आणि शक्ती केंद्र सदस्यांचे तसेच कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, विलासराव जगताप आणि सुरेश हाळवणकर, विजय पुराणिक, रवी अनासपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, रमेश शेंडगे, दिनकर पाटील, भगवान साळुंखे आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात देशभरातील भाजपच्या बूथ केंद्र, शक्ती केंद्र तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्याचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणूका जवळ येवू लागताच भाजपला पराभूत करण्यासाठी नवीन आघाड्या होवू लागल्या आहेत. ज्यांचे कधी आपसात जमले नव्हते ते एकत्र येताहेत. पाच वर्षात देशाची प्रगती झाल्याने 2019 च्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास पुढची 50 वर्ष सत्ता मिळणार नाही या धास्तीने ते एकत्र येत आहेत.' 

ते म्हणाले, "राज्यात भाजप चौथ्या क्रमांकावर होती. 2014 च्या निवडणुकीनंतर राज्यात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यातील अपवाद वगळता सगळ्या भाजपने जिंकल्या. आज भाजपचे दहा हजार सरपंच, 18 महापालिका, 90 नगरपालिका, 10 जिल्हा परिषदा, 123 आमदार 23 खासदार असून राज्यात पक्ष एक नंबरचा बनला आहे.' 

यावेळी दीपक शिंदे, स्थायी समिती सभापती अजिंक्‍य पाटील, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, गटनेते युवराज बावडेकर यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. 

तारखेस आचारसंहितेचा अंदाज 
लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सात किंवा आठ मार्चला आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी वर्तवली. फिर एक बार मोदी सरकारचा नारा यावेळी देण्यात आला. मोदींनी पाच वर्षात गरिब कल्याण अजेंडा राबवला. घरे, वीज, गॅस कनेक्‍शन, शौचालय दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा केले. आयुष्मान योजना सुरु केली. असा अजेंडा गेल्या 70 वर्षात कुठल्या सरकारने राबवला नाही, हे जनतेपर्यंत पोचवा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष श्री. दानवे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com