लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी नगरच्या एकावर गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी नगरच्या एकावर गुन्हा

सांगली - शहरातील बावीस वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पाटवले (जि. नगर) येथील एकावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. अजय ऊर्फ अविनाश संजय पवार असे त्याचे नाव आहे. त्याने शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन मोबाईलमध्ये अश्‍लील छायाचित्र काढून चित्रीकरणही सोशल मीडियावर व्हायरल केल्याचेही युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितीने फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी माहिती दिली, की पीडित युवती व संशयित पवार यांची जून २०१८ मध्ये इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्याने आपले नाव अजय पवार असे सांगितले. आपण व्यावसायिक असल्याचेही सांगितले. त्यानंतर संशयित सांगलीत आला. 
त्याने तिला एमपी लॉजवर नेले. तेथे त्याने ‘तू मला खूप आवडतेस. तुझ्यावर प्रेम आहे. लग्नही करणार आहे’, असे सांगून भुरळ पाडली. तिला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. अर्धवट शुद्धीवर असताना त्याने बलात्कार केला. त्याने मोबाईलवर तिचे छायाचित्र काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. जून २०१८ पासून त्याने धमक्‍या देत जबरदस्तीने संबंध ठेवले. 

दरम्यान, पीडितेच्या वडिलांच्या व्हॉट्‌स ॲपवर तिचे छायाचित्र देण्याची धमकीही तो देत होता. अखेर पीडितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार, आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक मिलिंद पाटील तपास करत आहेत. 

लॉजची तपासणी नाही
शहरातील अनेक लॉजवर कोणतेही ओळखपत्र न घेता प्रवेश दिला जातो. पोलिसांकडून नित्याने लॉजची तपासणी होते, असे सांगितले जाते. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर तापसणी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसते आहे. संबंधित लॉजची तपासणी होणार का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com