अल्पवयीन मुलीवर  वारंवार बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

श्रीरामपूर - तालुक्‍यातील खंडाळे येथे 14 वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोन अल्पवयीन मुले व एका शेतमजुरास पोलिसांनी बुधवारी पकडले. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा गुन्हा उघडकीस आला. 

रामराव गिरणारे असे त्या शेतमजुराचे नाव आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविले आहे. पीडित मुलगी सहा महिन्यांपूर्वी या शेतात पाणी आणण्यासाठी गेली होती. गिरणारेने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने याबाबत वाच्यता केली नाही. याचा गैरफायदा घेऊन गिरणारेने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. हा प्रकार गावातील दोन मुलांना समजल्यानंतर त्यांनी मुलीवर अत्याचार केले. दोन दिवसांपूर्वी या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने आईने तिला रुग्णालयात नेले. त्या वेळी ती गरोदर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. 

Web Title: Rape over minor girl