आढळला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल 

परशुराम कोकणे
गुरुवार, 17 जानेवारी 2019

सोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव येथे संतोष धाकपाडे आणि शुभम कोंडेवार यांनी दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुलच्या हालचाली टिपल्या आहेत. 

सोलापूर : नेचर कॉन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी सोलापुरात आधी एकदा रेकॉर्ड असलेला दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्षी परत शोधून काढला आहे. चपळगाव येथे संतोष धाकपाडे आणि शुभम कोंडेवार यांनी दुर्मिळ पांढऱ्या भुवयाचा बुलबुलच्या हालचाली टिपल्या आहेत. 

पांढऱ्या भुवयाचा बुलबुल या पक्षाला इंग्रजीमध्ये व्हाईट ब्रॉड बुलबुल असे म्हणतात. 2015 साली पहिल्यांदा हिरज परिसरात शिवानंद हिरेमठ यांना हा पक्षी दिसला होता. त्यानंतर 2018 साली चपळगाव येथील कुरनुर धरण येथे रत्नाकर हिरेमठ आणि सचिन पाटील यांना हा पक्षी दिसला. काही दिवसांनी लगेच सचिन जोग यांनीही हा पक्षी पाहिला. आता गेल्या आठवड्यात संतोष धाकपाडे आणि शुभम कोंडीवार यांनी पांढऱ्या भुवयाचा बुलबुल पक्ष्याच्या हालचाली टिपल्या आहेत. चपळगाव हे अतिशय समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले गाव आहे. चपळगाव येथील कुरनुर धरण परिसरात यंदा कैकर, पट्टकादंब, डोमिसेल क्रेन, कॉमन क्रेन, रोहित पक्षी असे भरपूर परदेशी पाहुणे तळ ठोकून आहेत. 

असा आहे हा बुलबुल...
पांढऱ्या भुवईच्या बुलबुल ही जात श्रीलंका आणि दक्षिण भारतात व प्रामुख्याने पश्‍चिम घाटात आढळून येते. ही जात खर बुलबुल किंवा सितभ्रू बुलबुल या नावाने देखील ओळखली जाते. त्याचा रंग फिकट ओलिव्ह हिरवा असून त्याला पांढरी भुवई असते. वड-पिंपळाची फळ आणि मध हे मुख्य अन्न असून वृक्षबीज प्रसाराच्या कामात मोलाचा वाटा आहे. झाडी झुडपांमध्ये अगदी चपळतेने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हालचाल करत असल्यामुळे सहज नजरेस पडत नाही. मोठ्या आवाजामुळे त्याला शोधता येवू शकते, असे संतोष धाकपाडे यांनी सांगितले.

Web Title: rare bird found in chapalgaon solapur