सांगली महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकी कॉंग्रेस आघाडीने 22 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात मिरजेतील जाहीर आठ जागांमध्ये दोघांनी समान चार जागा जिंकल्या आहेत. कुपवाडमध्ये प्रभाग एकमध्ये स्वाभीमानी आघाडीचे विजय घाडगे विजयी झाले. 

सर्वात धक्कादायक निकाल प्रभाग पंधराचा लागला. खासदार संजय पाटील यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. 

प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत पराभूत झाले. इथे कॉंग्रेसला बाय करून स्वाभीमानी आघाडीत दाखल झालेले उपमहापौर विजय घाडगे विजयी झाले. इथे माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, रईसा रंगरेज हे दोन्ही विजयी झाले. मिरजेत ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांचा मुलगा संदीप विजयी झाला. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला. 
सांगलीतील प्रभाग 15 मध्ये धक्कादायक निकाल लागले. खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेचा हा प्रभाग होता. नातलग कुटुंबिय सावर्डेकरांच्या कुटुंबातील सोनल, रणजीत पराभवाचा धक्का बसला. इथे युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मंगेश चव्हाण, फारुक पठाण यांनी खासदारांना धक्का देत कॉंग्रेसला इथे एकहाती यश मिळवून दिले. खासदारांनी या प्रभागात पंधरा दिवस तळ ठोकला होता. 

Web Title: rashtravadi congress leads in sangali corporation