मासे खाताय; मग ही बातमी वाचाच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

बेळगावात माशांचे चाहते कमी असले तरी पावसाळ्यातील काही दिवस वगळता मासळी बाजारात नेहमीच वर्दळ असते. माशांचे दरही कधी स्थिर राहत नाहीत. त्यात नेहमीच चढउतार होत असतो. पण, काही दिवसांत दरात मोठी वाढ झाली असून मासे सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत.

बेळगाव - : बेळगावात माशांचे चाहते कमी असले तरी पावसाळ्यातील काही दिवस वगळता मासळी बाजारात नेहमीच वर्दळ असते. माशांचे दरही कधी स्थिर राहत नाहीत. त्यात नेहमीच चढउतार होत असतो. पण, काही दिवसांत दरात मोठी वाढ झाली असून मासे सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहेत. आवक घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

हे पण वाचा - येडियुराप्पा सरकार कार्यकाळ पूर्ण करेल 

बेळगाव बाजारपेठेत प्रामुख्याने कारवार, गोवा व मालवणमधून माशांचा पुरवठा होतो. पहाटेच्या सुमारास मासे बाजारपेठेत दाखल होतात. कॅम्पमधील फिश मार्केट व कसाई गल्लीत मुख्य मासळी बाजार आहे. या बाजारात सकाळपासूनच गर्दी असते. मटणाच्या तुलनेत माशांचे खवय्ये कमी असल्याने ठराविक ग्राहक वर्गच मासे खरेदी करतो. हॉटेल व्यावसायिकही मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करत असल्याने मासळी बाजारात अपवाद वगळता बऱ्यापैकी गर्दी असते. त्यामुळे, हंगाम सोडल्यास दर फारसे बदलत नाहीत. ते स्थिर किंवा चढेच असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून माशांचे दर जरा जास्तच वाढले आहेत. 

हे पण वाचा - शेतकरी कर्जमाफीची यादी या तारखेला प्रसिद्ध...

शहर परिसरात बांगडा, पापलेट, सुरमई, रावस, कर्ली, कोळंबीला अधिक मागणी आहे. या माशांचा दर नेहमी चढाच असतो. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत दर प्रकारानुसार प्रतिकिलो 100 ते 300 रुपयांनी वाढले आहेत. पापलेटचा दर 900 ते 1200 तर सुरमईचा दर 700 ते 1000 रुपये झाला आहे. या दोन्ही माशांची आवकही घटली आहे. बांगड्यांच्या दरात तुलनेने कमी वाढ झाली असून ते 250 ते 300 रुपयांपर्यंत आहेत. मध्यम आकाराची कोळंबी 450 ते 500 रुपयांना मिळत आहे. त्याशिवाय दोडी, खांपी, सौंदाळे, तार्लीचाही या बऱ्यापैकी खप असलेल्या माशांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे, खवय्यांना आपल्या जीभेवर नियंत्रण आणावे लागत असून बाजारातील वर्दळही कमी होत आहे. 

माशांचे दर असे (प्रतिकिलो) 
माशाचा प्रकार*सध्याचा दर*पंधरा दिवसांपूर्वीचा दर 
पापलेट*900-1,200*800-1,000 
सुरमई*700-1,000*500-700 
रावस*400-500*300-400 
बांगडा*250-300*200-250 
कर्ली*300-350*250-300 
दोडी*250-300*200-250 
कोळंबी*450-500*350-400 

43787 
गेल्या पंधरा दिवसांपासून माशांची आवक कमी झाली आहे. मासेमारी घटल्याने ही परिस्थिती आहे. त्यामुळे, सर्वच माशांचे दरही वाढले आहेत. सुरमई, पापलेटसारख्या माशांची फार कमी आवक होत आहे. 
- सलीम सरकवास, मासे विक्रेता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rate increase of fish in belgaum market