रत्नागिरी : मालगुंडतील समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण

मोठ्या प्रमाणात अतिक्रमण; यंदा २० फूट किनारा गिळंकृत
समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण
समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माणsakal
Updated on

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकाजवळ असलेल्या पडवणेवाडीवर समुद्राच्या अतिक्रमणाचे मोठे संकट येऊन ठेपले आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्राने थोडा-थोडा या गावाचा किनारा गिळंकृत केला आहे. यंदा तर १५ ते २० फूट जमिनीचा भाग तुटुन तो समुद्रात वाहुन गेला आहे. त्यामुळे तेथील २५ घऱांना धोका निर्माण झाला असून उधाणाच्या भरतीवेळी ती भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या भागात धूपप्रतिबधक बंधारा घालून संरक्षण करावे, अशी मागणी पडवणेवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ठिकठिकाणी समुद्राचे अतिक्रमन वाढले आहे. मिऱ्या, काळबादेवी, सोमेश्वर खाडी, गुहागर, हर्णै, नाटे आदी भागात ही परिस्थिती आहे. समुद्राचे अतिक्रमन रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाय योजना करून सुमारे ३५ ते ४० ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे

बांधण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे. त्यामुळे या भागातील किनाऱ्यांची सुरक्षा होणार आहे.

समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण
Undri : पाऊस झाला की, हांडेवाडी रस्ता होतो जलमय

तसेच मिऱ्या येथील सुमारे साडे तीन किमीचा सर्वांत मोठा धूपप्रतिबंधक बंधारा बांधला जाणार आहे. १९० कोटीचे हे काम आहे. लवकरच या कामाला सुरवात होणार आहे. मात्र हे सर्व करत असताना तालुक्यातील पडवणेवाडी दुर्लक्षित राहिली आहे. या भागात देखील समुद्राने घुसखोरी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून समुद्र थोडा-थोडा करून काही मिटरचा किनारा गिळुन टाकला आहे. आता तर समुद्र तेथील वस्तीच्या घराजवळ येऊ लागला आहे.

पडवणेवाडी ही वरवडे ( भंडारवाडा ) या गावाचे मुलभूत अंग आहे. प्राचीन काळापासूनची प्रस्थापित आहे. परंतु या पडवणेवाडीकडे आता सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. तली खाडी ही केसपुरची खाडी म्हणून ओळख होती आता पडवणेखाडी म्हणून आताची पिढी तिला ओळखते. पडवणेवाडी खाडी आणि समुद्र याचा मध्यबिंदू आहे. याच पडवणेवाडीवर आता मोठे नैसर्गिक संकट आले आहे. पडवणेवाडीला पुढून आणि मागुन, बाजूने अशी तिन्हीकडून समुद्राचे अतिक्रमन सुरू आहे. अजस्र लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत आहेत.

समुद्राच्या अतिक्रमना मुळे दोन्ही बाजूने धोका निर्माण
सही मराठीत असल्यास मोजावे लागतात 500 रुपये

त्यामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप सुरू आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणताही बंधारा नाही. निव्वळ वाळुचा तट होता, तोही खाडीच्या पुराने व समुद्राने यंदा १५ फूट भाग तुटून वाहून गेला आहे. त्यामुळे येथील २५ एक घर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. वाडीच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूने संऱक्षण बंधारा बांधावा, अशी मागणी होत आहे.

खाडी आणि समुद्राचा मध्यबिंदू म्हणून पडवणेवाडीकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये मागुन आणि पुढुन किनाऱ्याच मोठी धूप झाली आले. वाडीला संरक्षण बंधारा नाही. पडवणेवाडी पूर आणि समुद्राच्या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस किनाऱ्याची धूप होत चालली आहे. यामुळे तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. तरी प्रशासनाने तत्काळ यावर उपायोजना कराव्यात एवढी आमची मागणी आहे.

-सु. बा. सरपडवळ, स्थानिक ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com