स्वाभीमानीतील बंडखोरांना भाजपची रसद - रवीकांत तुपकर

स्वाभीमानीतील बंडखोरांना भाजपची रसद - रवीकांत तुपकर

इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील पाटील प्रमुख उपस्थित होते. 

ते म्हणाले,"" स्वाभिमानी पक्षात फुट पडली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतु ज्यांनी बंडखोरी केली ते मुळात अनेक वर्षापासून संघटनेपासून दूर आहेत. स्वाभिमानी विरोधात दिशाभूल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून रसद पुरवून कुरघोडी करण्याचा डाव सुरु आहे. खासदार राजू शेट्टी चळवळीतून पुढे गेलेले नेते आहेत. संघर्ष हा स्वाभिमानीच्या पाचवीला पुजलेला आहे. शेट्टी यांच्या विरोधात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लढले तरी शेट्टींचा विजय पक्‍का आहे. आमचे तसे जाहीर आव्हान आहे. मोदींनी स्वतः येऊन लढावे.'' 

स्वाभिमानीच्या आंदोलनाने दूध उत्पादकांना दिलासा मिळाला. मात्र सरकार अनुदान न जमा करता दूध संघांची फसवणूक करीत आहे. ते त्वरित जमा न केल्यास आंदोलन करण्यात येईल.

- रविकांत तुपकर

ते म्हणाले, "" मोदी सरकार ग्लोबल्स नीतीचा वापर करतेय. खोट्या जाहिरातीत ते तरबेज आहेत. सामान्यांचा अपेक्षाभंग झाल्याने जनता सरकारच्या विरोधात बोलत आहे. 2019 परिवर्तन अटळ आहे. स्वाभिमानी लोकसभेच्या सात जागा लढवणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. सध्यातरी संघटना सर्व पक्षापासून समान अंतरावर आहे. थकीत एफआरपीसाठी लढाई सुरुच आहे. सहकार मंत्र्यांना 5 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेंट दिला होता. आता पंधरा दिवसात थकीत एफआरपी मिळाली नाही तर सहकार मंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मारु. सरकारला आता बोलण्याचे मुद्दे राहिले नसल्याने दोन समाजात भांडणे लावण्याचे उद्योग करीत आहे. सरकारच्या आश्रयानेच बियाणे कंपन्यांनी संगणमताने बोगस बियाणे बाजारात आणले आहे. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. सर्व सामान्य जनतेने सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. लवकरच ऊस परिषद घेऊन आगामी ऊस दर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com