रयत क्रांती संघटनेची कृषी मंत्री सदाभाऊंकडे धाव

 हुकूम मुलाणी 
सोमवार, 18 जून 2018

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याचा सन 2016- 17 चा खरीप हंगामाचा पिकविमा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नामंजूर झाला असून विम्यापासून वंचित सर्व शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याचा सन 2016- 17 चा खरीप हंगामाचा पिकविमा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नामंजूर झाला असून विम्यापासून वंचित सर्व शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

दै. सकाळमध्ये तालुका पिकविम्यातून वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. आ. भालकेंनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. सोलापूर येथे विश्रामगृहात रयत क्रांती संघटनेच्या हे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष पवार व तालुकाध्यक्ष तानाजी जाधव, रोहन इंगळे, अमिरभाई सुतार, अमोल घुले, धनाजी भोसले, संतोष खरजे, श्रीशैल पावले कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनाद्वारे तालुक्यातील पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांचा खरीपाचा विमा मंजूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम तात्काळ जमा करावी अशी मागणी केली.

शासनाने खरीप पिकविम्यात  जाचक अटी ठेवत प्रधानमंत्री फसल बिमा योजना जाहीर केली. यामध्ये शेतकरी व पिकाची माहिती अॅग्री इन्शुरन्स कंपनीच्या संकेतस्थळावर भरण्याच्या सुचना दिल्याने शेतकय्रांसह बॅकेचे अधिकारी मेटाकुटीला आले. खरीप पिकविम्याची रक्कम सात जूनपुर्वी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे खरीप पिक विम्याच्या आशेवर असलेल्या दुष्काळी तालुक्यातील शेतकय्रांची विमा कंपनीने भरपाई न देता अन्याय केला.डाळीब पिकाला  रिलायन्स इंन्सुरन्स विमा कंपनीने विमा भरपाई देते आणि खरीप पिकाचा ओरीएंटल इन्सुरन्स कंपनीने तालुकाच वगळून दुजाभाव केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील पिकाची स्थिती 8 आगस्ट 2017 च्या अंकात सकाळने मांडली होती तरीही विमा कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.

Web Title: rayat kranti sanghatana goes to agriculture minister sadabhau khot