esakal | कर्नाटकात लॉकडाऊन जाहीर झाल्याने आरसीयूच्या परिक्षा लांबणीवर

बोलून बातमी शोधा

कर्नाटकात लॉकडाऊन जाहीर झाल्याने आरसीयूच्या परिक्षा लांबणीवर
कर्नाटकात लॉकडाऊन जाहीर झाल्याने आरसीयूच्या परिक्षा लांबणीवर
sakal_logo
By
सतीश जाधव

बेळगाव : पहिल्यांदा परिवहन महामंडळाचा संप व आता कोरोनामुळे राज्यात लॉकाडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे राणी चन्नमा विद्यापीठाच्या (आरसीयु) मंगळवारपासून (२७) होणाऱ्या पदवी व पदव्यूत्तरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने सोमवारी (२६) एक पत्रक काढून माहिती दिली आहे. कोरोना काळातही परीक्षेचा निर्णय घेतला गेल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी होती. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्याने परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परीक्षेची पुढील तारीख विद्यापीठ लवकरच जाहीर करणार आहे.

राणी चन्नमा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर आणि एमबीए परीक्षा यापूर्वी 7 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत होणाऱ्या होत्या. परिवहनच्या संपामुळे त्यात बदल करून 19 एप्रिलपासून 4 मेपर्यंत परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. १९ एप्रिलपर्यंत परिवहनचा संप मिटला नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परिवहनचा संप मिटताच २७ एप्रिलपासून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी जोर धरू लागली होती. तरीही विद्यापीठ आपल्या भुमिकेवर ठाम होते.

हेही वाचा: कर्नाटकातही 14 दिवस Lockdown, उद्यापासून अंमलबजावणी

मंगळवारी (२७) परीक्षा होणार होती. मात्र, राज्य मंत्रीमंडळच्या सोमवारी झालेल्या बैठकीत १५ दिवस राज्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत बससेवाही पुर्णपणे बंद असणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने एक पत्रक काढून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. परिवहन महामंडळाचा संप व सध्या लॉकडाउनमुळे परीक्षा पुढे ढकलली असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरवर्षी एप्रिल-मे मध्ये दुसरी किंवा चौथी सेमीस्टर पार पडते. मात्र, अद्याप तिसरी सेमीस्टर सुरु आहे. यंदा नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास उशीर होणार आहे.