आघाड्यांसमोर बंडखोरी टाळण्याचे आव्हान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

कऱ्हाड - पालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत आघाड्यांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्यावर ठाम असल्यामुळे त्यातील कोणाला माघार घ्यायला लावायची? असा नेत्यांसमोर प्रश्‍न आहे. मात्र, दोन एबी फॉर्मची ही खेळी बंडखोरीच्या रूपाने अंगलट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

कऱ्हाड - पालिका निवडणुकीत अनेक प्रभागांत आघाड्यांनी दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहण्यावर ठाम असल्यामुळे त्यातील कोणाला माघार घ्यायला लावायची? असा नेत्यांसमोर प्रश्‍न आहे. मात्र, दोन एबी फॉर्मची ही खेळी बंडखोरीच्या रूपाने अंगलट येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

पालिका निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी नुकतीच झाली. त्यामध्ये आघाडी, पक्षाकडून अनेक प्रभागांमध्ये दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. आघाड्यांनी एबी फॉर्म दिल्याने संबंधित दोन्ही उमेदवार निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने तयारीला लागले. त्यामुळे मतदारांच्या गाठीभेटींसह स्थानिक पातळीवरील सर्व राजकीय जुळण्या केल्या जात आहेत. परंतु, छाननीवेळी आघाड्यांकडून प्राधान्यक्रम ठरवून दिलेले उमेदवार आघाड्यांचे व अन्य उमेदवार अपक्ष राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अर्ज माघारीच्या कालावधीत एबी फॉर्मसाठी अग्रक्रम असलेल्या पहिल्या क्रमाच्या उमेदवाराने माघार घेतल्यास दुसरा उमेदवार आघाडीचा अधिकृत उमेदवार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाचा एबी फॉर्म मिळाला असेल, तो उमेदवार अपक्ष समजला जाणार आहे. अर्ज माघारीनंतरच ते अपक्ष राहणार की, आघाडीचे अधिकृत होणार यावर शिक्कामोर्तब होईल. भाजप, यशवंत जनशक्ती आघाडीला प्रभाग सहा, आठ, नऊ, 11 सह अन्य प्रभागांतील उमेदवारीचा तिढा अद्याप डोकेदुखीचा ठरत असल्याने नेत्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणाला माघार घ्यायला लावयाची ? त्यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान आघाडी नेत्यांना पेलावे लाणार आहे. एबी फॉर्म मिळणार या शक्‍यतेने उमेदवारांनी तयारी केल्याने ते सध्या निवडणूक रिंगणातून माघार घ्यायला तयार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेत अनेकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे दोन एबी फॉर्म देवून विरोधी आघाड्यांना चांगला उमेदवार मिळू न देण्याची खेळी आघाड्यांच्या अंगलट येण्याची भीती व्यक्त होत आहे. 

उमेदवार न मिळालेल्या आघाड्यांकडून गळ! 

आघाडीने उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करत अपक्ष शड्डू ठोकण्याचा अनेकांनी इशारा दिला असला तरी त्या प्रभागात उमेदवार न मिळालेल्या आघाड्या "पुरस्कृत'साठी गळ टाकून बसल्या आहेत. त्यामुळे या गळाला कोण कोण लागून आपल्याच नेत्याची डोकेदुखी वाढवणार ? याकडे शहरवासीयांची उत्सुकता लागून आहे.

Web Title: Rebel fronts to avoid the challenge

टॅग्स