आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला मान्यता

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला मान्यता

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कामाला सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिवाळी भेट मिळाल्याची माहिती अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली.

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे. जिथपर्यंत काम झाले आहे, तिथपर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातुन पाणी मिळत आहे. मात्र या योजनेची मुदत संपल्याने निधीही मिळत नव्हता त्यामुळे उर्वरीत कामे रखडली होती. ही अडचण डोंगरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सांगीतली. देशमुख यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी चर्चा करून डोंगरे यांना सुधारीत प्रस्ताव दाखल करण्याची सूचना दिली. त्यानुसार फेरमंजुरीसाठी प्रस्ताव दाखल केला. प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्री महाजन यांनी शिफारस केली.

दरम्यान सोमवारी सह्याद्री अतीथी गृहात झालेल्या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी या योजनेस मान्यता दिली. या मान्यतेमुळे या योजनेच्या रखडलेल्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी सहकार्य केल्याबद्दल डोंगरे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मंत्री विजय शिवतारे, आमदार गणपतराव देशमुख, प्रशांत परिचारक यांचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com