साताऱ्यात गणेशमुर्ती विसर्जन स्थळाबाबत पुनर्रविचार याचिका दाखल होणार

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

​खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन मोती व मंगळवार तळ्यात विसर्जनास मान्यता द्यावी अशी मागणी केली होती.त्यावेळी सिंघल यांनी पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे असे सूचित केले होते.

सातारा : गणेशमुर्ती विसर्जन स्थळाबाबत उच्च न्यायालयात पुनर्रविचार याचिका दाखल करण्याचा ठराव आज (ता. 29, बुधवार) एकमताने मंजुर करण्यात आला. सातारा शहरात गणपती विसर्जन तळ्याबाबत न्यायालयाचे निर्बंध असल्याने पेच निर्माण झाला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन मोती व मंगळवार तळ्यात विसर्जनास मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी सिंघल यांनी पालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे असे सूचित केले होते.

आज (ता. 29, बुधवार) नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेचे विशेष सभा बोलविण्यात आली होती. या सभेत विसर्जन स्थळाबाबत उच्च न्यायालयात पुनर्रविचार याचिका दाखल करण्याचा ठराव एकमताने मंजुर करण्यात आला.

Web Title: Reconsideration petition will be filed for Ganeshmurti immersion site in Satara