

दिवाळीनंतर बेदाण्याच्या बाजारभावात मोठी उसळी आली आहे. एका किलोला तब्बल ₹४१० इतका दर मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.
esakal
Sangli Raisin Market : सांगलीत दिवाळीनंतर झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये तेरा दुकानांत ११ हजार बॉक्सची आवक झाली. बेदाण्यास उच्चांकी ४१० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या सौद्यामध्येच २५ ते ३० रुपये बाजारवाढ झाल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.