सांगली : दीड लाख नागरिकांसह 36 हजार जनावरांचे पुनर्वसन; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार 706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार 970 लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार 706 कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार 970 लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील 20 गावातील 4 हजार 968 कुटुंबांतील 25 हजार 375 लोक व 6 हजार 334 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार 461 कुटुंबांतील 36 हजार 636 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12 हजार 256 कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील 605कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2 हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 416 कुटुंबांतील 28 हजार 471 लोक व 608 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. 

मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 7 प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rehabilitation of 36 Thousand animals and one and half lakh Peoples in Sangli