शासनाची मदत न मिळाल्याने नातेवाईकांचा प्रेतं ताब्यात घेण्यास नकार

हुकूम मुलाणी
सोमवार, 2 जुलै 2018

मंगळवेढा (सोलापूर) : पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील चौघांची निर्घृण हत्या झालेल्या प्रेताचे शवविच्छेदन रात्रीच करण्यात आले असून कुटूंबातील कर्ते पुरुष गेल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना मदत व वारसांनी नोकरीची हमी दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : पोटासाठी भिक्षा मागण्यासाठी गेलेल्या तालुक्यातील चौघांची निर्घृण हत्या झालेल्या प्रेताचे शवविच्छेदन रात्रीच करण्यात आले असून कुटूंबातील कर्ते पुरुष गेल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना मदत व वारसांनी नोकरीची हमी दिल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

या घटनेचे वृत्त काल सायंकाळच्या सुमारास समजल्यावर गावावर भयाण शोककळा पसरली असून गावातील महिला असल्याने सुरुवातीला काय होतेय कोणाला समजेनासे झाले पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी ग्रामस्थ मारुती भोसले शिवाजी चौगुले दिगंबर माळवे या तिघांसह मारुती रेडडी, शहानुर फकीर हे प्रेत ताब्यात घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आज सकाळी 9 च्या दरम्यान दाखल झाले.

सध्या या ठिकाणी पोलिसाशिवाय कोणीच नसून कुटूंबातील कर्त्याची हत्या झाल्यामुळे कुटूंब उघड्यावर पडले असून शासनाने याबाबत अद्यापही कुटूंबाच्या सुरक्षिततेविषयी व वारसाच्या मदतीसाठी कोणतीच भूमिका न घेतल्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून प्रेत ताब्यात घेतले नाही.

या समाजातील नेते सध्या पिंपळनेरकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान गावात उपजिवेकेचे साधन नसल्यामुळे तीन महिन्यापासून भिक्षा मागण्यासाठी गेल्यामुळे खवे व मानेवाडी गाव शोकसागरात बुडाले. सोशल मीडियात त्यांच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे माणसातील माणुसकीबद्दल संतापजनक प्रतिक्रिया तालुक्यातून व्यक्त होत आहेत.

तर धुळ्यातील साक्री येथील मारहाण केलेले नागरिक ही पसार झाले असून गावात फक्त महिलावर्गच शिल्लक आहे.

भिक्षा मागण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असताना देखील याचा विचार न करता हत्या केली. या प्रकरणात धुळे पोलीस प्रमुखाशी बोललो असून यातील आरोपीला अटक केली असून आणखी आरोपीचा शोध चालूच असल्याचे सांगितले असले तरी वारसांना मदत व नोकरीचे आश्‍वासन सरकारने दिल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नाही.
- आ. भारत भालके 

Web Title: reject to collect dead bodies for no help from government