सावकाराच्या कचाट्यातून सामान्यांची सुटका करावी - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

पारनेर (नगर) : राज्यातील पतसंस्था देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यासाठी पतसंस्थांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवून ठेवी व कर्जवाटपाचा मेळ घालून खासगी सावकारांच्या कचाट्यातून सामान्यांची सुटका करावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. 

आदर्श ग्रामीण पतसंस्था व कॉ. माजी आमदार बाबासाहेब ठुबे पतसंस्थांच्या येथील दुसऱ्या शाखेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी, ऍड. आझाद ठुबे, नारायण गायकवाड, सभापती प्रशांत गायकवाड, डॉ. सुनील गंधे, डॉ. श्रीकांत पठारे, सैनिक बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, उपसरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे, ऍड. अशोक शेळके आदी उपस्थित होते. 

"संचालकांनी पतसंस्था म्हणजे व्यवसाय न समजता समाजसेवा समजावी. पतसंस्थेमुळे सावकारकीला आळा बसला असून, त्यातून ग्राहकांची पत सुधारावी हा हेतू आहे. पतसंस्थांमुळेच राळेगणची अर्थव्यवस्था बदलली,'' असे हजारे म्हणाले. जिल्हा उपनिबंधक आहेर म्हणाले, "जिल्हांतील सर्वाधिक पतसंस्था पारनेर तालुक्‍यात आहेत. मध्यंतरी पंतसंस्थेमध्ये काही अपप्रवृत्ती शिरल्या होत्या, त्यावर निर्बंध आणण्याचे काम हजारे यांनीच केले. अशा प्रवृत्ती थांबविल्या पाहिजेत.'' प्रास्ताविक उपाध्यक्ष दादा पठारे यांनी केले. शाहीर गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Relieve the people from the larceny s condescension