किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो...

किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो...

सातारा : मराठी भाषा दिवस हा सर्वांसाठीच अभिमानाचा विषय. मराठीची महती सर्वदूर पोचविण्यात जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदानही तितकेच महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामध्ये मराठी साहित्य विश्वात नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून परिचित असणाऱ्या कविवर्य बा. सी. मर्ढेकरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या दिवसाच्या निमित्ताने मर्ढेकरांच्या साहित्यिक कामगिरीचे स्मरण होत आहे. 

मर्ढेकर हे सातारा तालुक्‍यातील मर्ढे गावचे. पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोलनाक्‍यालगतच काही अंतरावर गावाकडे जाणारा रस्ता आहे. महामार्गाच्या पूर्वेला कृष्णा नदी ओलांडून पुढे गेले, की गावात पोचता येते. मर्ढेकरांमुळे या गावाला वलय प्राप्त झाले आहे. मराठी साहित्यातील एक युगप्रवर्तक कवी असा त्यांचा उल्लेख केला जातो. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक या प्रांतांतही महत्त्वाचे योगदान दिले. 
मर्ढेकरांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. ए. केल्यानंतर आरंभीला टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले. पुढे काही काळ इंग्रजीचे प्राध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. आकाशवाणीमध्ये केंद्र अधिकारी या पदावरही त्यांनी काम केले. 

किती तरी दिवसांत, 
नाही चांदण्यात गेलो। 
किती तरी दिवसांत, 
नाही नदीत डुंबलो।। 
यांसारख्या अजरामर कविता लिहिणाऱ्या मर्ढेकरांच्या साहित्यिक कार्याची दखल घेताना शासनाने गावामध्ये मध्यवर्ती ठिकाणी त्यांचे स्मारक उभारले आहे. हे स्मारक दुमजली असून, त्यामध्ये तळमजल्यावर मर्ढेकरांचा पुतळा, सभागृह, कार्यालय, ग्रंथालय, षटकोनी आकाराचे शिल्प अशी रचना आहे. पहिल्या मजल्यावर येणाऱ्या साहित्यिक व पर्यटकांसाठी दोन खोल्या भांडारगृह, अभ्यासिका यांचा समावेश आहे. 

पुस्तकप्रेमी मर्ढेकर 

रश्‍मी तुळजापूरकर यांच्या आजी या मर्ढेकरांच्या भगिनी. त्यांनी मर्ढेकरांच्या आठवणींतून गतकाळ जागविला. "लहानपणापासून बाळला वाचनाचे प्रचंड वेड होते. हातातील प्रत्येक पुस्तक तो अत्यंत एकाग्रतेने वाचत असायचा. बाळच्या पुस्तकप्रेमाला तोडच नव्हती, ही आठवणही त्यांनी अधोरेखित केल्याचे तुळजापूरकर सांगतात.

जरुर वाचा : Video : बाप हो देव पाहिला का देव ?

हेही वाचा : ऐका : मी काय अशी तशी वाटले का ? दाेन लाख सत्तर हजारच पाहिजेत

वाचा : रायबाच्या शिक्षणासाठी लाखमोलाची मदत; तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांची भावना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com