लक्षात ठेवा....विमा कंपनीचा चार हजार कोटींचा क्‍लेम!

तात्या लांडगे
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- सव्वा कोटी शेतकऱ्यांनी भरला पीकविम्याचा 579 कोटींचा हिस्सा
- कृषी विभाग अन्‌ विमा कंपनीने सुंरु केला उंबरठा उत्पन्नाचा आढावा
- जानेवारी 2020 मध्ये सरकारला जाणार नुकसानीचा अहवाल
- नुकसानग्रस्त बळीराजाची सरकारी मदतीवरच भिस्त
 

सोलापूर : राज्यातील एक कोटी 26 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2019 मधील पीकविम्याचा 578 कोटी 85 लाखांचा हिस्सा विमा कंपनीला भरला. आता सध्याचे नुकसान आणि उंबरठा उत्पन्नाचा अहवाल जानेवारीत शासनाला सादर केला जाणार आहे. तत्पूर्वी, विमा कंपनी राज्य व केंद्र सरकारकडे तीन हजार 943 कोटींचा क्‍लेम करणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना किती रक्‍कम मिळणार याबाबत अद्याप कोणताही अधिकारी स्पष्टपणे सांगू शकत नाही. दरम्यान, आता क्‍लेम कॅलक्‍युलेशन सुरू झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाच....

aschim-maharashtra/arecha-sum-time-points-mba-professors-242694">अरेच्चा...एमबीएच्या प्राध्यापकांना जमेना गुणांची बेरीज

मागील दुष्काळाची खडतर वाट पार करून आता पावसाच्या भरवशावर पिकांचे जतन केलेल्या बळिराजाला पूर अन्‌ अतिवृष्टीचा फटका बसला. तत्कालीन सरकारने पूरग्रस्तांना दोन हेक्‍टरपर्यंत पीक कर्जमाफी जाहीर केली. दरम्यान, नुकसानभरपाई देण्याच्या उद्देशाने केंद्रीय पथकाने या आपत्तींच्या नुकसानीची पाहणीही केली. मात्र, अद्याप केंद्र भरपाई तर राज्य सरकारकडून कर्जमाफी मिळाली नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या भरपाईसाठी पीकविमा भरला. त्यातून आलेल्या पैशातून कुटुंबाचा खडतर प्रवास सावरण्याचे स्वप्न आता बळिराजाने पाहिले आहे. मात्र, फेब्रुवारीपर्यंत मदत मिळणे अपेक्षित असतानाही बळिराजाला मदत कधीपर्यंत मिळेल, याबाबत विमा कंपन्यांनी सध्यातरी तोंडावर बोट ठेवले आहे.

हेही वाचाच...अबब..729 जागांसाठी सव्वातीन लाख उमेदवार

राज्याची स्थिती (खरीप पीकविमा-2019)
एकूण शेतकरी
1.26 कोटी
पीकविम्यातील क्षेत्र
67 लाख हेक्‍टर
शेतकरी हिस्सा
578.85 कोटी
विमा कंपनीचा क्‍लेम
3,943 कोटी
-
राज्यातील एक कोटी 26 लाख शेतकऱ्यांनी खरीप 2019 चा पीकविमा भरला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी 578 कोटी 85 लाखांचा हिस्सा भरला आहे. त्यानुसार विमा कंपनीने राज्य व केंद्र सरकारकडे एकूण चार हजार 522 कोटींचा क्‍लेम करण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी, उंबरठा उत्पन्नाचा आढावा घेऊन जानेवारीत सरकारला अहवाल पाठविला जाणार असून त्यानुसार शेतकऱ्यांना मदत मिळेल.
- डी. बी. पाटील, उपसंचालक, कृषी, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remember .... Insurance company claims four thousand crore!