मोहोळ - जैन मंदिरांच्या जिर्णोद्धाराला सुरवात

राजकुमार शहा 
मंगळवार, 12 जून 2018

मोहोळ : सोलापुर पुणे सातारा उस्मानाबाद व अहमदनगर या पाच जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील जुन्या जैन मंदिरांचा जीर्णोद्वार सन्मती सेवा दलाने लोकवर्गणीतुन करण्याचा उपक्रम हाती घेतला असुन प्राचीन ठेवा जपण्याच्या या कामाचा आरंभ जवळा (ता. जामखेड) येथुन सुरू केल्याची माहिती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी दिली.

मोहोळ : सोलापुर पुणे सातारा उस्मानाबाद व अहमदनगर या पाच जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील जुन्या जैन मंदिरांचा जीर्णोद्वार सन्मती सेवा दलाने लोकवर्गणीतुन करण्याचा उपक्रम हाती घेतला असुन प्राचीन ठेवा जपण्याच्या या कामाचा आरंभ जवळा (ता. जामखेड) येथुन सुरू केल्याची माहिती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना गांधी म्हणाले सन्मती सेवादल ही वरील पाच जिल्ह्यातील युवकांचे नेतृत्व करणारी राज्यस्तरीय संघटना आहे संघटनेच्या वतीने आज पर्यत रक्तदान शिबीरे मोफत  आरोग्य तपासणी गरजुना शस्त्रक्रियेसाठी मदत वधु वर मेळावे यासह अन्य सामाजीक उपक्रम राबविले आहेत सध्या ग्रामीण भागात जैन समाज अत्यल्प आहे जो आहे तोही अर्थिकदृष्टया दुर्बल आहे ग्रामिण भागात दिडशे ते दोनशे वर्षापुर्वीची जैन मंदीरे आहेत, त्यांची पडझड झाली असून अत्यंत दुरावस्था झाली आहे. मात्र समाज कमी असल्याने त्याची देखभाल होत नाही.

दरम्यान जवळा (ता. जामखेड) येथे सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी  स्थापत्य अभियंता संजय फडे जेष्ठ मार्गदर्शक बाबुभाई गांधी यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी सुमारे दिडशे वर्षांपूर्वीचे भगवान नेमीनाथ यांचे पुरातन मंदिर आहे. त्यावरील कलाकुसर रेखीव व अप्रतीम आहे तर मंदीरातील अनेक मुरत्या या अडगळीत पडलेल्या होत्या त्या  सन्मती सेवा दलाच्या कार्यकर्त्यानी मंदीरात आणुन ठेवल्या व त्या दर्शनासाठी खुल्या केल्या या वेळी जवळा येथील श्रावक महावीर शहा संतोष भालेराव अशोक जैन प्रशांत दोशी माणिकलाल व्होरा संदिप शहा नमन गांधी अक्षय दोशी प्रितम दोशी विजय गांधी विक्रांत गांधी संमेद शहा उपस्थीत होते.

येथील भगवान नेमिनाथांचे मंदीर सुमारे दिडशे वर्षापुर्वीचे असुन ते अतिशय क्षेत्र आहे त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्याचा जिर्णोद्वार करणे गरजेचे आहे सन्मती सेवा दलाने हे काम हाती घेतल्याने खुप आनंद झाला आहे.
- महावीर शहा (श्रावक जवळा) 

नवीन मंदीरे बांधुन त्यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा जुन्या मंदीरांचा जिर्णोद्धार केला तर पुरातन ठेवा जपला जाणार आहे व नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण होईल.
- मिहीर गांधी (अध्यक्ष सन्मती सेवा दल)

Web Title: renovation of jain temple starts in mohol