अद्यापही शालेय मुलांना मोबाईलचे व्यसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अद्यापही शालेय मुलांना मोबाईलचे व्यसन

अद्यापही शालेय मुलांना मोबाईलचे व्यसन

-अजित सुतार

चिक्कोडी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने अंगणवाडीपासून माध्यमिक टप्प्यातील शाळेतील ऑनलाइन क्लास थांबवून वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे शालेय उपक्रम पूर्वपदावर येत असतानाच दोन वर्षापासून ऑनलाइनद्वारे अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही मोबाईलचे व्यसन सुटलेले नाही. त्यामुळे पालकांसह शिक्षकांची डोकेदुखी ठरत आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांना भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी?

बहुतेक मुले मोबाईलमध्ये अद्याप मग्न आहेत. शाळेला जात असली तरी मोबाईलच्या मानसिकतेतच आहेत. त्यामुळे मुलांच्या अभ्यासात एकाग्रता लागणे अशक्य होत असल्याने पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही शाळांनी ऑनलाईन, ऑफलाईन वर्गांना परवानगी दिल्याने सर्वाधिक मुले ऑनलाइन अभ्यासाला प्राधान्य देत आहेत. ऑनलाइनद्वारे अभ्यास करण्यास सोपे असल्याने पालकांचे मनःपरिवर्तन करून घरातच राहुन अभ्यासाला पसंती देत आहेत. त्यानुसार दिवसभर चार-पाच तास मोबाईलमध्येच ऑनलाइन वर्ग, त्यानंतर एक-दोन तास होमवर्क करून गेम्स, कार्टूनचे व्हिडिओ पाहत आहेत. त्यामुळे दोन वर्षापासून मुले मोबाईलमध्येच गुंतून पडली आहेत. आता मुलांना मोबाईलपासून दूर राहणे अशक्य होत आहे. तर काही मुले शाळेतून आल्यानंतर पालकांशी वाद घालत मोबाईल घेऊन त्यामध्ये वेळ घालवत आहेत.

हेही वाचा: भाजपने पैसे वाटले, दंगलीचं रचलं सुनियोजित षडयंत्र - नवाब मलिक

काही मुले शाळेला येताना मोबाईल घेऊन येत असून शाळेत शिक्षक नसताना मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना काळात ऑनलाइन क्लासला हजर राहण्यासाठी मुलांवर दबाव घालणाऱ्या पालकांना आता मोबाईलपासून दूर राहण्यासाठी मुलांवर दबाव घालण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाइन क्लासमुळे मोबाईलची जवळीक केलेल्या मुलांना आता मोबाईलपासून दूर होणे अशक्य होत आहे.

मुलांमध्ये जनजागृती आवश्यक

घरामध्ये पालकांनी मोबाईलचा वापर कमी करावा. मोबाईलपासून होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल मुलांमध्ये जागृती करावी. शाळेत मुलांना मैदानात खेळण्यास परवानगी द्यावी. मनोरंजनासाठी केवळ मोबाइल पर्याय नसल्याचे समजावून सांगणे गरजेचे आहे, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

`कोरोनामुळे दोन वर्षापासून ऑनलाइनद्वारे मुलांना शिक्षण दिले होते. सध्या सर्व पूर्वपदावर आल्याने पुन्हा शाळा प्रारंभ झाल्या आहेत. मात्र मुले ऑनलाइन दुनियेतून बाहेर आलेली नसून त्यातच गुंतून गेल्याने मुलांचा त्रास सहन करावा लागत आहे`.

-काशिनाथ खोत, पालक, यादनवाडी.

loading image
go to top