आरक्षणासाठी सोलापूरात धनगर समाजाचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सोलापूर - धनगर समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामांतर करावे, आरक्षण व नामांतर लढ्यावेळी कार्यकर्त्यांवर नोंदविलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या परमेश्वर घोंगडे व योगेश कारके यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी धनगर आरक्षण कृती समितीचे प्रा. शिवाजीराव बंडगर, नगरसेवक चेतन नरोटे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, संतोष वाकसे, अर्जुन सलगर, परमेश्वर कोळेकर, विलास पाटील, निमिषा वाघमोडे, धनाजी गावडे, कालिदास गावडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख नेत्यांनी धनगर सामाजाच्या आरक्षण तत्काळ अंमलबजावणी भाजप सरकारने करावी अन्यथा आगामी निवडणुकीत हिसका दाखवू, असा इशारा दिला. तसेच समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा उपस्थित धनगर बांधवांकडून देण्यात आला.

Web Title: For the reservation of dhangar samaj Morcha in Solapur