रिझर्व्ह बॅंकेकडे जमा नोटा हिशेबापेक्षा अधिक? - अभ्यंकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

सांगली - बाजारात सोडलेल्यांपेक्षा अधिक रकमेच्या नोटा जमा असू शकतात. त्यामुळेच वीस दिवसांनंतरही नेमक्‍या जमा नोटांचा हिशेब रिझर्व्ह बॅंकेला सांगता येत नसावा, अशी शंका ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांनी आज व्यक्त केली. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 

देशात काळ्या पैशाविरोधात ऐतिहासिक असे जनमत तयार झाले असून, ही संधी साधून केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या विविध स्रोताविरोधात धाडसी कारवाई केली पाहिजे. त्यासाठी सरकारवर दबाव म्हणून आयकर विभागाच्या कार्यालयावर तरुणांनी निदर्शने-धरणे आंदोलने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.  

सुमारे दीड तासाच्या भाषणात केंद्राच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांनी हा निर्णय गलथान व्यवस्थापनामुळे अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पैचा हिशेब लावल्याशिवाय बॅंकेचा कॅशिअर काऊंटर बंद करीत नसेल तर रिझर्व्ह बॅंकेला वीस दिवस उलटल्यानंतरही जमा नोटांचा आकडा का जाहीर करीत नाही? ही गंभीर गफलत आहे. १९४८ पासून देशाबाहेर ६५० अब्ज डॉलर्स म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चाळीस पट इतकी रक्कम देशाबाहेर गेली आहे. हाच पैसा परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून वायदे बाजारात येतो. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होतात.’’

ते म्हणाले, ‘‘खोट्या नोटांचे आव्हान आता अधिक वाढले आहे. कारण दोन हजारांची नोट खरी की खोटी हे तपासणारी यंत्रणाच आज बॅंकांकडे नाही. बॅंकांनी स्वीकारलेले पैसेही बनावट असू शकतात, कारण सध्याची मशिन्स फक्त पेपर आणि शाईची सत्यता पडताळणीस सक्षम आहेत. या दोन्ही गोष्टी परदेशातून आयात केल्या आहेत. आपल्याकडे फक्त छपाईच होते. त्यामुळे छपाई हेच आपले नोटा तपासणीचे मुख्य मानक हवे होते. १९९७ मध्ये आपण एक लाख कोटी रुपयांच्या नोटा परदेशातून छापून आणल्या. त्यातच बनावट नोटा निर्मितीचे मूळ आहे.’’
 
अभ्यंकर म्हणाले, 

  • कॅशलेस व्यवहाराचा आग्रह म्हणजे फलाटाविना रेल्वे सोडण्यासारखे आहे.
  • ६३ उद्योजकांचे कर्ज राईट ऑफची वेळ आणणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी.
  • नोटाबंदीपूर्वी संशायस्पदरीत्या २ लाख कोटींच्या ठेवी वाढल्याच कशा?
  • काळा पैसा बंद होण्यासाठी भारताला कर भरण्याची लाइफ स्टाइल बानवावी लागेल.
  • बॅंकाकडे जमा १५ लाख कोटी पायाभूत क्षेत्राकडे वळवले पाहिजेत.
Web Title: The Reserve Bank deposit accounts of more than currency?