सांगली जिल्हा बॅंकेच्या संचालकांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी उशिरा राजीनामे दिले. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या संचालकांनी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसच्या संचालकांनी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याकडे ते सुपुर्द केले आहेत. त्यांनी अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्‍य झाल्याचे कारण सांगितले आहे.

सांगली- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या संचालकांनी मंगळवारी उशिरा राजीनामे दिले. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या संचालकांनी जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे तर कॉंग्रेसच्या संचालकांनी जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांच्याकडे ते सुपुर्द केले आहेत. त्यांनी अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे काम करणे अशक्‍य झाल्याचे कारण सांगितले आहे.

नोकरभरतीस अध्यक्षांनी घातलेला खो, अध्यक्ष बदलाची मागणी यातून हे राजीनामा सत्र असल्याचे समजते. यापुर्वीचे बंड फसले होते. कालच दिलिप पाटील यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठीही हा धक्का मानला जातो. विद्यमान अध्यक्ष पाटील विश्‍वासात घेवून कारभार करीत नाहीत यासाठी चार महिन्यांपूर्वी सत्ताधारी संचालकांनी बंड केले होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संचालकांशी चर्चा करुन प्रकरण मिटवले होते. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नोकरभरती होत नसल्याने संचालकांत प्रचंड नाराजी आहे. अध्यक्ष पाटील यांच्याकडून नोकरभरतीला प्रतिसाद नसल्याची संचालकांत जोरदार चर्चा आहे. राज्यातील पाच जिल्हा बॅंकांतील नोकरभरती केली. मात्र तेथील संचालक मंडळ या कारणावरून विद्यमान राज्य सरकारने संचालक मंडळ बरखास्त केल होते.

नोकरभरतीची प्रक्रिया सुरु करु असे केवळ आश्‍वासन पाटील यांनी दिले होते. त्यातून असंतोष होता. अखेर काल रात्री एकाचवेळी राजीनामे देण्यात आले. आता दोन्ही कॉंग्रेसचे नेते मंडळी कोणती भूमिका घेतात याबाबत कुतूहल आहे.

Web Title: Resignation of the directors of Sangli District Bank