गडहिंग्लज पालिका उपनगराध्यक्ष उदय पाटील यांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

गडहिंग्लज - येथील पालिकेचे उपनगराध्यक्ष उदय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी शुक्रवारी (ता. 4) निवड प्रक्रिया होणार असून नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता त्यासाठी विशेष सभा होणार आहे. दरम्यान, दरवर्षी एका इच्छूक नगरसेवकाला उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय जनता दलाने घेतला आहे. या पक्षीय धोरणानुसार पाटील यांनी पदाचा राजीनामा दिला. 

शुक्रवारी (ता. 4) सकाळी दहा ते बारापर्यंत मुख्याधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणे, सव्वा बाराला छाननी आणि साडेबारापर्यंत माघार, त्यानंतर उपनगराध्यक्ष निवड घोषित होईल. पालिकेत जनता दल, भाजप व शिवसेना अशी गडहिंग्लज विकास आघाडी सत्तेवर आहे. उपनगराध्यक्षपद जनता दलाकडे आहे. पहिल्या वर्षी नितीन देसाई यांना संधी दिली होती. दुसऱ्या वर्षी पाटील यांची निवड झाली.

उपनगराध्यक्षांकडे आरोग्य समितीचेही सभापतीपद असते. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पाटील यांच्या कार्यकालात शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेचे चांगले काम झाले. स्वच्छतेतील सातत्यमुळे देशाच्या पश्‍चिम विभागातील पाच राज्यांत पालिकेचा 38 वा क्रमांक आला. पाच कोटींचे बक्षीस जाहीर झाले. आरोग्य विभागातंर्गत स्वच्छतेचे नियोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शहरात पाच ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले. भूसंपादनासाठी टीडीआरसह हद्दवाढीच्या प्रश्‍नातही त्यांचा पाठपुरावा राहिला. 
 
महिला नगरसेविकांना संधी? 
दरम्यान, जनता दलाचे राजेश बोरगावे व बसवराज खणगावे यांनी यापूर्वी नगराध्यक्षपद भूषविले आहे. नरेंद्र भद्रापूर यांच्याकडे बांधकाम सभापतीपद आहे. यामुळे या रिक्त पदावर एखाद्या महिला नगरसेविकेला संधी मिळण्याची शक्‍यता असली तरी अंतिम निर्णय नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांचाच राहणार आहे. यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: resignation of Gadhinglaj Municipality Deputy Chairman Uday Patil