Bribe Case Sangli : सांगली महापालिकेत निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, आठवड्यात सलग दुसरी मोहीम

Miraj Police : उत्पन्नाच्या १६३ टक्के अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे चौकशीत समोर आले. पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्‍यासह त्याच्या पत्नीवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Bribe Case Sangli
Bribe Case Sangliesakal
Updated on

Sangli Municipal Bribe Case : महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडील निवृत्त लिपिकाकडे ३५ लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत प्रकार उघडकीस आला. उत्पन्नाच्या १६३ टक्के अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे चौकशीत समोर आले. पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्‍यासह त्याच्या पत्नीवर मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन भीमराव उत्तुरे (वय ६३) व वंदना नितीन उत्तुरे (दोघे सांगलीकर मळा, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com