
कुरळप (जिल्हा सांगली) - सी.बी.आय. अधिकारी असल्याचा बनाव करत काळ्या पैशाच्या व्यवहारात नाव आले असून तुम्हाला आम्ही तात्काळ अटक करणार आहोत, अशी फोनवरून धमकी देत वशी (ता. वाळवा) येथील सेवानिवृत्त सैनिकाला साडेपंधरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.