बनावट दाखल्यांसह गुणपत्रिका देणाऱ्या निवृत्त शिक्षकास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सांगली/ तासगाव - बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे दाखले देणाऱ्या वासुंबे (ता. तासगाव) येथील निवृत्त शिक्षकासह चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

सांगली/ तासगाव - बनावट गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे दाखले देणाऱ्या वासुंबे (ता. तासगाव) येथील निवृत्त शिक्षकासह चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.

किरण गणपत होवाळे (वय ४२), अशोक किसन इंगळे (वय ३०, संजय गांधी झोपडपट्टी), बशीर बाळू मुल्ला (वय ३८, वडर कॉलनी), हणमंत तिम्माप्पा गोल्लार (वय २५, संजय गांधी झोपडपट्टी) अशी त्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून  चिंचणी (ता. तासगाव) येथील डी. के. पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आणि यशवंत हायस्कूल (तासगाव) या शाळांचे बनावट दाखले, गुणपत्रिका, बनावट शिक्के जप्त केले आहेत. प्रत्येकांकडून ही टोळी एका दाखल्यासाठी १० ते १५ हजार रुपये घेत असल्याचेही समोर आले आहे. ही बोगसगिरी उजेडात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

अधिक माहिती अशी, की किरण होवाळे हा या टोळीचा म्होरक्‍या आहे. तो चिंचणी (ता. तासगाव) येथील एका विद्यालयात शिक्षक होता. त्यानंतर त्याने हा धंदा सुरू केला. गरजूंकडून दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन हा दाखले देत असल्याचे समोर आले. तासगावमधील एकास आज दाखला देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला व ताब्यात घेतले. त्याच्याकडे बनावट गुणपत्रिका असल्याचे निष्पन्न झाले. अन्य तिघांकडेही अनेक बनावट गुणपत्रिका आढळून आल्या.

Web Title: retired teacher arrested in fake mark-sheet case