मिळालेले बक्षिस दिले पाणी फाउंडेशनच्या कामासाठी  

किरण चव्हाण 
मंगळवार, 8 मे 2018

माढा (सोलापूर)- येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरूदेवाच्या यात्रेनिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत विठ्ठलवाडीतील सनराईज क्रिकेट क्लबने चार हजारांचे बक्षिस जिंकले. विजेत्यांनी हे  बक्षिस पाणी फाउंडेशनच्या कामासाठी सरपंच बालाजी गव्हाणे व पाणी फाउंडेशनचे धनाजी सस्ते यांच्याकडे सुपूर्द केले.

सध्या पाणी फाउंडेशनच्या जलसंधारणाच्या कामासाठी  सर्वच स्तरातून मदत होत असून, ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंनीही बक्षिसाची रक्कम या कामासाठी दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विठ्ठलवाडीमध्ये सध्या ओढा, तलाव खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. यासाठी प्राज इंडस्ट्रीज पुणे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गंगामाईनगर-पिंपळनेर व ग्रामस्थ आणि युवकांनी दिलेल्या लोकवर्गणीतून फाउंडेशनचा उपक्रम जोरदार सुरू आहे.

सनराईज क्रिकेट क्लबने पाणी फाउंडेशनच्या कामासाठी बक्षिस देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  संघातील विकास अधिकारी विजय गव्हाणे, नितीन कदम, विनोद मोटे, अशोक जाधव,अजित बरबडे, प्रशांत कदम, सोमनाथ बरबडे, जयराम भिसे यांच्यासह संघातील खेळाडूंनी ही सकारात्मक भूमिका घेतल्याने खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: reward given for the work of the Water Foundation