

काँग्रेसने जयंत पाटील यांच्यासमवेत आघाडी करू नये, अशी भूमिका विशाल पाटील यांनी घेतली असल्याची चर्चा आहे.
esakal
Sangli Politics : ‘‘खासदार विशाल पाटील यांचे फार मनावर घेऊ नका. ते अपक्ष आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीबाबत आमची त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे,’’ अशी टोलेबाजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. आष्टा येथे माध्यमांशी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या वाटाघाटीत विशाल यांना खिंडीत गाठणारी भूमिका मांडली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.