तुकोबांच्या पालखीतील नेत्रदिपक रिंगण सोहळा

सचिन शिंदे 
बुधवार, 18 जुलै 2018

सकाळी निरास्नानंतर सोलापुर जिल्ह्याच प्रवेश केलेल्या संत तुकाराम महाराज पालथी सोहळ्याचे उत्साहाच स्वागत झाले. साडेजहाच्या सुमारास रिंगण सोहळा लागण्यास सुरवात झाली.

अकलूज - वायु वेगाने धावलेल्या अश्वाने गोल रिंगणाच्या तीन फेऱ्या मारल्या अन् आल्हादायक वातावरणात रंगलेला संत तुकोबा पालखी सोहळ्यातील गोल रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळी निरास्नानंतर सोलापुर जिल्ह्याच प्रवेश केलेल्या संत तुकाराम महाराज पालथी सोहळ्याचे उत्साहाच स्वागत झाले. साडेदहाच्या सुमारास रिंगण सोहळा लागण्यास सुरवात झाली. दिंड्यातील पताका, तुळशयस घेतलेल्या महिला, पखवाड वादक व टाळकरी रिंगणात आले. त्यानंतर पालखी पादुका रथ आणण्यात आला. पादुकांची प्रदक्षिणा झाली. उपस्थीत वारकऱ्यांनी टाळ्यांच्या गजराच पालखीचे स्वागत केले. त्यांनतर झेंडेकरी, तुळस घेतलेल्या महिला, टाळकरी व पखवाड वादक रिंगणात धावले. त्यानतंर अश्व धावले. वायु वेगाने धावणाऱ्या माऊलीच्या अश्वाने तीन फेऱ्या मारल्या अन् डोळ्यात साठवावा असा गोल रिंगण सोहळा पार पडला. यानंतर वारकऱ्यांनी पारंपारिक खेळ केले.

Web Title: Ringan sohla at akluj