ओढ्याला वाहतंय 24 बाय 7 पाणी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सातारा - टंचाईमुळे पाणी कमी मिळत असल्याची सबब एका बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगते, तर दुसऱ्या बाजूस गेंडामाळ नाक्‍यावर मात्र सुमारे अर्धा इंची व्यासाच्या जलवाहिनी इतके पाणी २४ तास १२ महिने वाहून ओढ्याला मिळत आहे. 

शाहूपुरीवासीय पाणीटंचाईला तोंड देत आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन उन्हाळ्यामुळे मागणी वाढली; मात्र पुरवठा कमी झाल्याचे कारण देत आहे. चार-चार दिवस पाणी नसल्याने शाहूपुरीतील नागरिकांनी काल प्राधिकरणात जाऊन गांधीगिरी केली होती. त्यामध्ये शाहूपुरीत विविध ठिकाणी जलवाहिन्यांना लागलेल्या गळत्या काढण्याची मागणी केली होती. 

गेंडामाळ नाक्‍यावर, मारुती मंदिराजवळ प्राधिकरणाचा एक व्हॉल्व आहे. अनेक वर्षांपासून त्यामधून पाणी गळती सुरू आहे. मात्र, प्राधिकरणाला ती दूर करता आली नाही. तंत्रज्ञानात सुधारणा होत असताना अद्यापी प्राधिकरणाला साधी एक गळती काढता येत नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात होत. ही गळती काढण्याऐवजी प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी ‘आयडिया’ केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाणी गळतीच्या ठिकाणी पसरणारे पाणी कोणाच्या दृष्टीस पडू नये म्हणून गळतीच्या ठिकाणावरून जवळच्या ओढ्यापर्यंत एक पाट खोदला. या पाटामुळे कर्मचाऱ्यांचे काम भागले. झुडपांच्या गर्दीतून काढलेल्या या पाटात आजही २४ तास १२ महिने पाणी वाहत असते. अर्धा इंची जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याइतके हे पाणी रोज वाया जात असते. एका बाजूला नागरिकांना प्यायला पुरेसे पाणी नाही. नळाच्या पाण्यासाठी चार-चार दिवस वाट पाहावी लागते. दुसऱ्या बाजूस शुद्ध केलेले पाणी चक्क ओढ्यात सोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्राधिकरणाला आतातरी जाग येईल का, असा सवाल शाहूपुरीवायीस उपस्थित करत आहेत.

Web Title: rivulet water