अक्कलकोट स्टेशन ते सोलापूर रस्त्याची वाताहत

राजशेखर चौधरी
रविवार, 29 एप्रिल 2018

प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीच्या दृष्टीने हा रस्ता रुंदीकरणासह नव्याने डांबरीकरण होण्याची मागणी होत आहे.अक्कलकोट स्टेशन ते सोलापूर मार्गे जेऊर हा ४० किलोमीटरचा रस्ता आहे पण तोच अक्कलकोट मार्गे गेल्यास ५६ किलोमीटर होते म्हणजे हा रस्ता १६ किलोमीटरने अंतरात कमी बसतो.

अक्कलकोट : अक्कलकोट स्टेशन ते सोलापूर मार्गे जेऊर हा कर्नाटक आणि महाराष्ट्र्र या दोन राज्यांना दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा रस्त्या दुर्लक्षित असून या रस्त्याची वाताहत झाली आहे.

प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीच्या दृष्टीने हा रस्ता रुंदीकरणासह नव्याने डांबरीकरण होण्याची मागणी होत आहे.अक्कलकोट स्टेशन ते सोलापूर मार्गे जेऊर हा ४० किलोमीटरचा रस्ता आहे पण तोच अक्कलकोट मार्गे गेल्यास ५६ किलोमीटर होते म्हणजे हा रस्ता १६ किलोमीटरने अंतरात कमी बसतो. हा रस्ता नव्याने डांबरीकरण झाल्यास त्यात वेळ,इंधन आणि पैसा या तिन्हींची बचत होते.हा रस्ता अक्कलकोट स्टेशनच्या पुढे होसुर,माशाळ,मणुर आणि गुब्याड या चार वेगवेगळ्या मार्गाने पंधरा ते वीस किलोमीटर अंतराने कर्नाटक हद्दीत प्रवेश करतो.

कर्नाटक हद्द सुरू झाली की तेथे पुढे जाणारे हेच मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या रूपाने पूर्ण झालेले सुंदर रस्ते पाहायला मिळतात पण महाराष्ट्र हद्दीत याची दयनीय अवस्था आहे. या मार्गावर जेऊरचे काशीविश्वेश्वर, गौडगाव मारुती मंदिर, हैद्रा ख्वाजा दर्गाह तसेच पुढे घतरगा धानम्मा देवी आणि गाणगापूर दत्त मंदिर ही प्रसिद्ध धार्मिक क्षेत्रे आहेत आणि याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, झुआरी आणि चेट्टीनाड या सिमेंटच्या कंपन्या आणि जयहिंद शुगर तसेच एन टी पी सी औष्णिक विद्युत केंद्र या सर्व महत्वाच्या बाबी याच मार्गावर आहेत.तरी हा रस्ता तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मार्गावर बससेवाच सध्या सुरू नाही. संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच अवैध धोकादायक बाबीवर अवलंबून आहे.तरी संबंधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बाबींचा सत्वर विचार करून या मार्गावरील होटगी स्टेशन ते अक्कलकोट स्टेशन या अती बिघडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी तातडीने मार्गी लावावा अशी मागणी होत आहे.

Web Title: road on akkalkot to solapur