मांजरीवाडी येथील बालिकेचे दरोडेखोराकडून अपहरण

काही तासांतच छडा : मांजरीचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात
Robbers abducted by Manjariwadi girl
Robbers abducted by Manjariwadi girlsakal

मांजरी : मांजरीवाडी (ता. चिक्कोडी) येथील अकरा वर्षीय बालिकेचे रविवारी (ता. ३) रात्री मांजरी गावचा रहिवासी व प्रख्यात दरोडेखोर असलेल्या अनिल रामू उर्फ तम्माणी लंबुगोळ याने अपहरण केले. मात्र अंकली पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचा छडा लावून बालिकेची सुटका केली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास चालविला आहे. या प्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत अंकली पोलिस स्थानकातून समजलेली माहिती अशी, मांजरी गावचा रहिवासी, प्रख्यात दरोडेखोर व पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला अनिल रामा ऊर्फ तम्मान्नी लंबुगोळ हा रविवारी (ता. ३) रात्री मांजरीवाडी येथे बालिकेच्या घराची कौले काढून चोरी करत असताना घरातील सदस्यांना निदर्शनास आला. यावेळी घराच्या बाहेर असलेल्या अकरा वर्षीय बालिकेला खांद्यावर घेऊन तिचे अपहरण केले.

बालिकेचे अपहरण झाल्याचे समजताच अंकली पाेलिसांनी अनिल लंबुगोळ याच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान केली. मात्र सकाळपर्यंत त्यांचा पत्ता लागलेला नाही. पण आज (ता. ४) बारावाजेपर्यंत सदर आरोपी सदलगा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याचा सुगावा लागला. अंकली पोलिस ठाण्याचे अधिकारी सदलगा पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या कारदगा गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घरी पोहोचले. तेथून आरोपी व बालिकेला ताब्यात घेऊन त्यांची सदलगा पोलिस ठाण्यात हजरी केले. वैद्यकीय तपासणी करून अंकली पोलिस ठाण्यात आणल्याचे सांगण्यात आले. दरोडेखोराने बालिकेचे अपहरण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र जोरदारपणे सुरू होती

सदर अपहरण झालेली बालिका दलित समाजातील असल्याने मांजरी येथील सर्व मागासवर्गीय, दलित जनतेने अंकली पोलिस ठाण्याला घेरावा घातला. चिक्कोडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज एलगार यांना चांगलेच धारेवर धरले. आरोपी व अपहरण झालेली बालिका मिळत नाही, तोपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून हालणार नाही, असा पवित्रा घेतला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई केली. आरोपी ज्या ठिकाणी आहे, त्याठिकाणी जाऊन ताब्यात घेतल्याचे सांगितल्यावर सर्वजण पोलिस ठाण्यातून घरी गेले. आरोपी व त्याच्या कुटूंबीयांना मांजरी गावातून हद्दपार करावे, अशी मागणी दलित समाजातील सर्वच जनतेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com