कोल्हापूर : भाऊसिंगजीरोडवरील मोबाईल दुकानात चोरी 

कोल्हापूर : भाऊसिंगजीरोडवरील मोबाईल दुकानात चोरी 

कोल्हापूर - भाऊसिंगजीरोडवरील मोबाईल दुकानाच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने सात मोबाईल संचसह 70 हजाराची रोकड लंपास केली. चोरटा सीसी टीव्हीत कैद झाला आहे. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, गजबजलेल्या भाऊसिंगजी रोड सारस्वत बॅंकेच्या समोरील गाळ्यात "योगीराज कम्युनिकेशन' नावाचे मोबाईल दुकान आहे. हे दुकान योगेश गणेश बनछोडे (रा. रमणमाळ) यांच्या मालकीचे आहे. काल रात्री त्यांनी नेहमी प्रमाणे दुकान बंद केले. दुकाना शेजारी आणखी एक मोबाईल दुकान असून त्याला लागून जिल्हा परिषद दुकान गाळ्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

मध्यरात्री चोरट्याने पहिल्या मजल्यावरील उघड्या खिडकीच्या अगदी निमुळत्या जागेतून त्याने आत प्रवेश केला. जिन्यावरून तो दुकानात पोहचला. त्यानंतर त्यांने शोरूमधील कपाटातील सात सेकंड हॅन्ड मोबाईल आणि कपाट उचकटून त्यातील 70 हजाराची रोकड लंपास केली. आज सकाळी बनछोडे यांनी दुकान उघडले. त्यानंतर त्यांना काचेच्या कपाटातील मोबाईल संच आणि ड्रॉव्हरमधील रोकड नसल्याचे लक्षात आले. त्यांनी याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यांनी ठसे तंज्ञाना पाचारण केले. दरम्यान दुकानातील सीसी टीव्हीत संशयित चोरटा कैद झाला आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

खिडकीतून चोरटा शिरला... 
मोबाईलच्या दुकानाच्या पहिल्या मजल्यावर अत्यंत छोटी जागा आहे. त्यात दुकानातील साहित्य ठेवले जाते. त्याच्या शेजारी खिडकी आहे. या खिडकीला काचा नाहीत. मात्र दोन्ही लोखंडी अँगमधील अंतर हे अत्यंत कमी आहे. तरीही या खिडकी पर्यंत चोरटा पोहचला कसा. खिडकीच्या निमुळत्या अँगल मधून दुकानात शिरला व तेथून चोरी करून बाहेर कसा पडला याचे आश्‍चर्य परिसरातून व्यक्‍त केले जाते होते. 

चोरटा सीसी टीव्हीत कैद 
दुकानात चोरी करताना सीसी टीव्हीत चोरटा कैद झाला आहे. तो अंगाने सडपातळ असून त्यांने तोंडाला फडके बांधले होते. अत्यत शांतडोक्‍याने त्याने दुकानातील वस्तू उचकटल्या. त्यानंतर त्याने त्यातील रोकड लंपास केली. त्यानंतर तो शांतपणे तेथून गेल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळी संशयित चोरट्याच्या बुटाचे ठसेही पोलिसांना मिळून आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com