सांगलीवाडीत दोन ट्रॅक्‍टर - ट्रेलरची चोरी

सांगलीवाडीत दोन ट्रॅक्‍टर - ट्रेलरची चोरी

सांगली - सांगलीवाडी येथील शेतकरी अमृत एकनाथ पाटील (वय 30, रा. किसान चौक) यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्‍टर आणि दोन ट्रेलर चोरट्याने लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला. सर्वत्र शोध घेऊन ट्रॅक्‍टर व ट्रेलर न मिळाल्यामुळे श्री. पाटील यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की श्री. पाटील यांच्या मालकीचे दोन ट्रॅक्‍टर (एचएच 10 एवाय 8222) व (एमएच 10 सीएन 2639) आणि ट्रेलर (एमएच 10 बीझेड 1190) व (एन 08 एमबी 3146) आहेत. त्यापैकी नवीन ट्रॅक्‍टर वीटभट्टीवर आणि जूना ट्रॅक्‍टर शेतात वापरतात. 24 फेब्रुवारीला दैनंदिन काम आटोपल्यानंतर सायंकाळी एक ट्रॅक्‍टर शेतात तर एक ट्रॅक्‍टर, ट्रेलर उपळावीकर मळ्यात वीटभट्टीवर लावला होता. 25 रोजी पहाटे पाच वाजता श्री. पाटील हे शेतात गेल्यानंतर त्यांना ट्रॅक्‍टर व ट्रेलर जागेवर नसल्याचे लक्षात आले.

आजूबाजूला शोध घेऊनही सापडला नाही. त्यानंतर ते वीटभट्टीकडे आले. तिथे लावलेला नविन ट्रॅक्‍टर व ट्रेलरही नसल्याचे दिसले. वीटभट्टीची खेप घेऊन ट्रॅक्‍टर गेला असेल असे सुरवातीला वाटले. परंतू काही वेळानंतर तो देखील गायब झाल्याचे समजले. ट्रॅक्‍टर व ट्रेलरची किंमत 15 लाखाच्या आसपास आहे.

चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर श्री. पाटील यांनी चार दिवस मित्र व कामगारांच्या मदतीने सर्वत्र शोध घेतला. त्यानंतरही शोध लागला नाही. त्यामुळे काल (ता.28) रात्री सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com