कसरतींतून  'ताे' भागवतोय शिक्षणाचा खर्च 

कसरतींतून  'ताे' भागवतोय शिक्षणाचा खर्च 

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : कोल्हापूर जिल्ह्यातील सातवे (ता. पन्हाळा) गावातील रोहन आबा सकटे (वय 13) हा चिमुरडा योगासनांची प्रात्यक्षिके दाखवून आपल्या शैक्षणिक खर्चासाठी बिदागी कमावत आहे.

अवश्य वाचा -  सातारा पाेलिस म्हणतात, है तयार हम I
 
पश्‍चिम महाराष्ट्रातील कुस्ती मैदानात योगासनांच्या कसरती करून त्याने नाव कमावले आहे. येथील (कै.) मारुती रावजी कापूरकर समाधी परिसरात जयवंतराव भोसले यांच्या जयंत्तीनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानात रोहनने योगासनाची प्रात्यक्षिके दाखवून कुस्ती शौकिनांची मने जिंकली. त्याच्या वडिलांना कुस्तीचा छंद आहे. रोहनला ते मैदानांसाठी घेऊन जातात. स्वतः शिकवलेली योग प्रात्यक्षिके अतिशय चपळतेने सादर करून रोहन हा मैदानात सर्वांची वाहवा मिळवतो.

तो अंगाने दिसायला अगदी काडीसारखा असला, तरी त्याच्या योगासनाच्या कसरती पाहून बघणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहारे येतात. त्याच्या कसरती पाहून शौकिनांचे हात खिशात जातात आणि त्या गरजूला खुराकाएवढी एव्हाना शैक्षणिक खर्चाइतकी बिदागी मिळते.

हेही वाचा - कॉंग्रेसच्या वर्धापन दिनीच यांची हकालपट्टी
 
आबा सकटे हे शेती व मजुरीची कामे करतात. ते पैलवान आहेत. त्यांना कुस्तीचा नाद असल्यामुळे गावातील सातवे हायस्कूलला आठवीत शिकणाऱ्या रोहनला त्यांनी शिक्षणाबरोबर कुस्तीचा सराव करण्याचा नाद लावला आहे.

रोहन हा गावातील कुस्ती आखाड्यात दररोज सराव करतो. त्याचे शरीर कसदार आणि काटक रहावे, म्हणून वडिलांनी त्याला वयाच्या चौथ्या वर्षापासूनच स्वतः योगाचे शिक्षण दिले. त्या प्रात्यक्षिकांच्या कसरती दाखवण्यासाठी रोहनला घेऊन वडील त्याला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मैदानांना जातात.

जरुर वाचा - मनाचं वेळीच ऐका (डॉ. हमीद दाभोलकर)

मैदानाच्या मध्यंतरावेळी रोहन हा योगाच्या कसरती करण्यासाठी आखाड्यावर येतो. दरवर्षी 70 ते 80 मैदानात तो योग प्रात्यक्षिके दाखवतो. प्रत्येक मैदानात त्याला पाचशेपासून एक हजारापर्यंत बक्षीस मिळते. कोल्हापूरच्या मार्केट यार्डमधील धर्मेंद्र दुबे यांनी दहा हजारांचे मोठे बक्षीस त्याला दिले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विनय कोरे यांनी त्याचा गौरव केला आहे.

हेही वाचा - गुलाबी थंडीत ते पडले प्रेमात ?

आम्ही पैशासाठी कुस्ती मैदानांना जात नाही. तर मला छंद असल्याने कुस्त्या बघायला जाताना रोहनला घेऊन जातो. तेथे त्याने कमावलेली योगविद्या शौकिनांना दाखवतो. घरची परिस्थिती बेताची आहे. तरीही रोहनला नामवंत योगापटूबरोबर कुस्तीपटू करण्याची जिद्द आहे. 

- आबा सकटे, आबा सकटे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com