रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांत कवठे महंकाळात जुंपली

विजयानंतर भर रस्त्यावर कार्यकर्ते आणि विरोधक एकमेकांना भिडले.
Rohit Patil
Rohit PatilEsakal

सांगली: कवठे महंकाळमध्ये नगरपंचायत निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील (R. R. Patil)यांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने (NCP)या नगरपंचायतीत एकूण १० जागांवर विजय मिळवला आहे. तर शेतकरी विकास गटाला ३ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान या विजयानंतर रोहित पाटील यांनी कवठे महंकाळमधील नागरीकांचे आभार मानले. आबांचे स्वप्न पूर्ण झालं अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचबरोबर हा विजय विनम्रतेने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. आज स्वर्गीय आबांची आठवण मनात दाटून येत आहे. आबांनाही नक्कीच आजच्या विजयाचा आनंद झाला असेल,असे ही ते म्हणाले.

दरम्यान, या विजयानंतर भर रस्त्यावर कार्यकर्ते एकमेकांना भिडले. निवडून आल्यावर कार्यकर्त्यां एकमेकात भर रस्त्यावर निवडून आलेले आणि पराभव झालेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते यांच्यात मारहाण झाली. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थ करत कार्यकर्त्यांना बाजूला केले.

Rohit Patil
सांगली - कवठे महाकांळ नगरपंचायतीत राष्ट्रवादीची मुसंडी

'माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही'

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहित पाटील यांच्यावर प्रचाराची भिस्त होती. वडिलांवरून त्यांच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पाटील यांनी माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही, अशी टिप्पणी केली होती. अखेर रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com