तब्बल 30 जेसीबींनी गुलाल उधळत रोहित पवार यांची मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहीत पवार हे निवडून आल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात येणार असल्याने ३० जेसीबी मशिनच्या साह्याने गुलाल उधळून त्यांचे वाजत गाजत कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. नगरमध्ये जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे.

जामखेड : कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहीत पवार हे निवडून आल्यानंतर प्रथमच जामखेड शहरात येणार असल्याने ३० जेसीबी मशिनच्या साह्याने गुलाल उधळून त्यांचे वाजत गाजत कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे. नगरमध्ये जामखेड शहरातून रोहित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे.

प्रत्येक चौकात एका जेसेबीने गुलाल उधळून रोहित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येत असून जवळपास शहरातील प्रत्येक चौकात अशा मिळून एकूण 30 जेसीबी आहेत. निवडून आल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदाच जामखेड शहरात आले आहेत. जनतेचे आभार मानण्यासाठी रोहित पवार जामखेड शहरात आले असता त्यांची भव्य आभार मिरवणूक शहरातून काढण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर असून तेथिल शेतकऱ्यांचे पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. शरद पवार स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अशावेळी रोहित पवार यांची गुलाल उधळत भव्य मिरवणूक निघ्याल्याने साहेब शेतात तर रोहित पवार गुलालात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar congratulate rally in Jamkhed City