Rojgar Hami Yojna: शासकिय जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेची अनेक कामे बंद अवस्थेत

Sangali: ३४ रूपये ६४ पैसे कमिशनसाठी कामाच्या ठिकाणी जाणे ग्रामरोजगार सेवकांना परवडणारे नसल्याने ते आता बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी होण्यास तयार नसल्याचे दिसून येते.
Rojgar Hami Yojna
Rojgar Hami YojnaSAKAL

किल्ले मच्छिंद्रगड (सांगली) - ग्रामीण विकासाचा कणा आणि शाश्वत विकासाची वाहिनी असलेली रोजगार हमी योजना ऑनलाईन हजेरी घेण्याच्या शासकिय धोरणामुळे अखेरची घटका मोजण्यास सुरवात झाली आहे. जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता इथूनपुढे ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना ब्रेक लागणार आहे. तर ऑनलाईन हजेरी घेण्याच्या शासकिय धोरणामुळे तालुक्यांतील अनेक कामे अर्धवट अवस्थेत बंद पडू लागली आहेत.

प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेमलेल्या मजुरांची रोज सकाळ, सायंकाळ प्रत्यक्ष हजेरी घेणे शासनाने बंधनकारक केल्याने रोजगार हमी योजनेसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या ग्रामपंचायत घटकाची डोकेदुखी वाढीस लागली आहे.

Rojgar Hami Yojna
Rojgar Hami Yojana : रोजगार हमीच्या कामांना ऑनलाइन हजेरी सक्तीची

गावचे कोणतेही सार्वाजनिक काम गावापासून दोन ते चार किलोमीटरवर सुरू असले तरी अशा कामाच्या ठिकाणी जावून हजेरी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे दोन मजूर कामावर असतील आणि दोघांच्या प्रत्येकी २७२ रूपये प्रमाणे मिळून ५४४ रुपयांच्या मजुरीच्या कामातून मिळणाऱ्या ३४ रूपये ६४ पैसे कमिशनसाठी कामाच्या ठिकाणी जाणे ग्रामरोजगार सेवकांना परवडणारे नसल्याने ते आता बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी होण्यास तयार नसल्याचे दिसून येते. परिणामी सुरू असलेली रस्ते, वृक्षालागवड कामे बंद पडली आहेत.

ऑफलाईन हजेरी असावी, मजूर मात्र नोंदणीकृत असावेत. मोजमाप पुस्तीकेप्रमाणे कामाची मजुरी देवून कामे करून घेण्यात यावीत. तरच योजना टिकून राहील आणि व्यक्तिगत लाभाची शाश्वत विकासाची कामे होऊन शासनाचे शाश्वत विकासाचे मिशन प्रगतीपथावर राहील अन्यथा रोजगार हमी योजनेबरोबर शाश्वत विकासाचा गळा घोटला जाईल. असे सध्याचे चित्र आहे.

Rojgar Hami Yojna
Rojgar Melava: नागपूर येथे 9 व 10 डिसेंबरला रोजगार मेळावा; या संकेतस्थळावर करा नोंदणी

सर्व्हर डाऊन काळात यंत्रणा ठरतेय कुचकामी...

"सर्व्हर डाऊन झाल्यानंतर कामावर आलेल्या मजुरांची ऑनलाईन हजेरी घेणे शक्य नाही. अशा परिस्थतीमध्ये मजूर आणि रोहयो यंत्रणेचे अधिकारी यांच्यात संघर्ष होण्यासदृश परिस्थिती निर्माण होवू लागली आहे.

हजेरी न लागलेल्या दिवसाची मजुरीची रक्कम मजुराच्या बँक खात्यात जमा होणार नसल्याने मजुराचा कामाचा दिवस वाया जात असल्याने काम केलेल्या दिवसाची मजुरांची रक्कम कोणी द्यायची यावरून यंत्रणेतील अधिकारी आणि मजूर यांच्यात खटके उडण्याचे प्रसंग घडू लागले आहेत. कामांची पुर्तता होण्यासाठी रोहयो करीता शासनाने सुटेबल धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

Rojgar Hami Yojna
PM Modi Rojgar Mela 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ हजार तरुणांना देणार ऑफर लेटर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com