कोल्हापूरः निवडणुकीत उद्योजकांची सरकारविरोधात भूमिका

कोल्हापूरः निवडणुकीत उद्योजकांची सरकारविरोधात भूमिका

कोल्हापूर - उद्योगासाठी महावितरणने सप्टेंबरपासून सातत्याने वीज दरवाढ केली आहे. दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झाली असून, या दरवाढीविरोधात उद्योजकांत तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. ही अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी; अन्यथा लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेण्याबरोबरच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा उद्योजकांनी पत्रकार परिषदेत दिला. उद्योजकांची फसवणूक करणाऱ्या या सरकारला विधानसभा निवडणुकीत सत्तेवरून खेचू, असा इशारा यावेळी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

याबाबत स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, की महावितरणने सप्टेंबर २०१८ मध्ये सरासरी २५ ते ३० टक्के वीजदरवाढ केली होती. त्याचबरोबर आता पुन्हा १२ टक्के दरवाढ केली आहे. ही वाढ १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार आहे. त्यामुळे सरासरी ४० टक्के वीज दरवाढ झाली आहे. महाराष्ट्रातील वीजदर इतर राज्यांच्या तुलनेत २५ ते ३५ टक्के जास्त आहेत. वीज दरवाढीमुळे उद्योग आणि व्यापारावर अतिशय विपरीत आणि गंभीर परिणाम होत आहेत. वीज दरवाढीचा फटका औद्योगिक, व्यापारी, शेती, हॉटेल्स, थिएटर, हॉस्पिटल, पेट्रोलपंप, प्रिंटिंग प्रेस, टिंबर उद्योग, चर्मोद्योग आणि घरगुती या सर्वच वीज ग्राहकांना बसत आहे.’’

श्री. शेटे म्हणाले, ‘‘सरकारने केलेली वीज दरवाढ निषेधार्ह असून वीजदरवाढीबाबतीत सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा; अन्यथा आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सरकारला सत्तेवरून खेचू.’’ स्मॅकचे श्री. पाटील म्हणाले, ‘‘या सरकारने वारंवार आश्‍वासन देऊनही याबाबत काहीच केले नाही. मुख्यमंत्र्यांना याची जाणीव होती; मात्र त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. वीजदरवाढ आणि वाढीव स्थिर आकार तत्काळ रद्द करावा; अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत या सरकारविरोधात भूमिका घेऊ.’’

वीज दरवाढीमुळे उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ही तत्काळ रद्द करावी; अन्यथा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सर्वांनीच दिला. यावेळी उद्योजक हरिश्‍चंद्र धोत्रे, शीतल केटकाळे, गोरख माळी, संगीता नलवडे यांच्यासह जिल्ह्यातील इतर उद्योजक उपस्थित होते.

ईएसआय हॉस्पिटलमध्ये सुविधा नगण्य
यावेळी  उद्योजक चंद्रकांत जाधव, इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष काशीनाथ जगदाळे यांनी कामगारांसाठी आवश्‍यक असलेल्या ईएसआय हॉस्पिटलमध्ये तातडीने सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी केली. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक महिन्याला ईएसआयसाठी ११ कोटी रुपये उद्योजकांना भरावे लागतात; मात्र सुविधा नगण्य मिळतात. जिल्ह्यात एकूण ३६ हजार उद्योग आहेत. यामध्ये कोल्हापुरातील २० हजार तर इचलकरंजीतील १६ हजार उद्योगांचा समावेश आहे. एकूण कामगार १५ ते २० लाख आहेत. यातील सुमारे १० लाख कामगार ईएसआयला जोडले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com