सांगोल्यात शेकापला 'हा' उमेदवार देणार कडवी लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अनेक वर्षांपासून ते मंत्री महादेव जानकर यांचे ते खंदेसमर्थक म्हणून परिचित आहेत. सांगोल्याची जागा युतीमधून कुणाला सुटणार हेही पहावे लागणार आहे. शेकापची उमेदवारी नवख्या उमेदवाराच्या गळ्यात पडल्यास आणि गणपतराव देशमुख उमेदवार नसतील तर सांगोल्याची निवडणूक रंगतदार होणार आहे.

सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचा (शेकाप) बालेकिल्ला असणाऱ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात तब्बल बारा वेळा निवडणूक जिंकण्याचा विक्रम करणारे आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहिर केले आहे. शेकापचा उमेदवार कोण? ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) शेकापविरोधात लढण्याची तयारी सुरु केली आहे. 

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुटी 

आमदार गणपतराव देशमुखांनी निवडणूक लढावी म्हणून शेकाप कार्यकर्त्यांनी रान तापवायला सुरु केले आहे. यातच धनगर समाजात लोकप्रिय असणारे रासपचे प्रवक्ते माणदेशी ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि सांगोल्यातील एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे प्रा. लक्ष्मण हाके निवडणूक लढतील अशी शक्यता आहे.

Video : आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघाची समाप्ती होईल : मेवाणी

अनेक वर्षांपासून ते मंत्री महादेव जानकर यांचे ते खंदेसमर्थक म्हणून परिचित आहेत. सांगोल्याची जागा युतीमधून कुणाला सुटणार हेही पहावे लागणार आहे.

किल्ल्यांतून ‘छमछम’चा इतिहास सांगणार का?

शेकापची उमेदवारी नवख्या उमेदवाराच्या गळ्यात पडल्यास आणि गणपतराव देशमुख उमेदवार नसतील तर सांगोल्याची निवडणूक रंगतदार होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RSP candidate may be contest Sangola assembly seat in Vidhna Sabha 2019