बेळगावात गोवा बनावटीची 35 लाखाची दारु जप्त

अमृत वेताळ
Thursday, 27 August 2020

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

बेळगाव : विटांची वाहतूक करण्यात येत असल्याचे भासवत गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दहा चाकी लॉरीवर कारवाई करुन सुमारे 35 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई बुधवार रात्री चिकोडी अबकारी उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शहरातील राधानगर रोड अंडरपास वळणावर केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचा - कोल्हापूरात वाहतूक बंदीचा असाही परिणाम; 60 कोटींवर फिरले पाणी...

धनपालसिंग तोमर आणि राजू कंठी (दोघेही रा. इंदोर, राज्य मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहे. अशी माहिती अबकारीचे सहआयुक्‍त डॉ. वाय. मंजुनाथ यांनी दिली. गोवा बनावटीच्या मद्याची एका दहा चाकी लॉरीतून गुजरातला बेकायदा वाहतूक केली जाणार आहे. अशी खात्रीशीर माहिती अबकारी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून चिकोडीचे अधिकारी आणि कर्मचारी या कामात व्यस्त होते. 

काल रात्री सदर वाहनाला निपाणी शहरातील राधानगर रोड अंडरपास वळणावर थांबवून ही कारवाई करण्यात आली. लॉरीमध्ये दारु असल्याचे समजू नये, यासाठी दोन कप्पे तयार करण्यात आले होते. मागे आणि वरील भागात विटा ठेवण्यात आल्या होत्या. तर त्या खाली मद्याचे बॉक्‍स ठेवण्यात आले होते. वाहनातील वरील दोघांना अटक करुन सदर वाहन बेळगाव अबकारी भवनाकडे आणण्यात आले.

हेही वाचा -  जिल्हाधिकाऱ्यांनी केली  पोस्ट :  माझ्याच कुटुंबातील हजारो लोक कोरोनाग्रस्त अन्..

विटा खाली उतरविण्यात आल्या त्यावेळी पंधरा लाख रुपये किमतीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे सहाशे बॉक्‍स जप्त करण्यात आले. 20 लाख रुपये किमतीची दारु असा एकून 35 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. ही कारवाई चिकोडी विभागाचे उबकारी उपायुक्‍त के. अरुणकुमार, अबकारी उपअधीक्षक विजकुमार हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.  

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rupees 35 lakh goa made alcohol fine in belgaum police arrested two people