स्वामी पुण्यतिथीनिमित्त समर्थ नगरीत हजारो भाविकांची मांदियाळी 

राजशेखर चौधरी
शनिवार, 14 एप्रिल 2018

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या १४० व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर येथे श्री स्वामी समर्थांच्या १४० व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले.

अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी 'श्री स्वामी समर्थ महाराज की जय' या अबाल वृद्धांच्या जयघोषात संपूर्ण आसमंत दुमदुमला. पहाटे ४ पासूनच श्रींच्या दर्शनाकरिता स्थानिक व परगावाहून आलेल्या भाविकांची गर्दी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय करून, भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता कापडी मंडप उभारून विशेष सोय करण्यात आली होती. 

पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची काकडआरती झाली. नगरप्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत निघाली. देवस्थानचे वतीने पारंपरिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोचारात पार पडले, व नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योती मंडपात सकाळी ७ वाजता देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे हस्ते व सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने करण्यात आली. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती त्यानंतर अन्नछत्र मंडळाचा महानैवेद्य संपन्न झाला. दुपारी १२ वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने युवराज मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे आणि पालकमंत्री ना. विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्तिथीत श्रीं ना महानैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेत देवस्थानच्या पूर्वेकडील उपहारगृह परिसरात व भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आला.

हजारो स्वामी भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी भक्तांना कमीत कमी वेळात सुलभतेने दर्शन होण्याकरिता समितीचे अध्यक्ष  महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी व सेवेकऱ्यानी प्ररिश्रम घेतले.तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्मसंकीर्तन सोहळ्याची  समाप्ती  करण्यात आली.

भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजनसेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली. पारायण सेवा देवस्थानच्या विश्वस्ता सौ उज्वलाताई सरदेशमुख, भजनसेवा श्री तात्यासाहेब घाटगे व धर्मसंकीर्तन सोहळा डॉ. हेरंबराज पाठक यांचे अधिपत्याखाली पार पडले.

यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, एड. प्रदीप झपके, विजय दास, गणेश दिवाणजी, नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी, नगरसेवक महेश हिंडोळे, राजकुमार मसुती, उपनगराध्यक्ष यशवंत तात्या धोंगडे, शशिकांत लिम्बीतोटे, शिवशरण अचलेर, प्रशांत गुरव, गिरीश ग्रामोपाध्ये, श्रीनिवास इंगळे, प्रथमेश इंगळे, मंगेश फुटाणे, चंद्रकांत डांगे, नंदू जगदाळे, श्रीशैल गवंडी, संजय पाठक, संतोष देगावकर, स्वामीनाथ लोणारी, तुळशीराम आवटे, शंकरराव पवार, मल्लिनाथ बोधले, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी बाळासाहेब घाटगे, मल्लिनाथ स्वामी, सागर गोंडाळ, दीपक जरीपटके, गिरीश ग्रामोपाध्ये, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, राजेश नीलवाणी, गुणवंत बागूल, यांच्यासह असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते. 

Web Title: rush in akkalkot due to swami samarth death anniversary