बळीराजा सुखी समाधानी होऊ दे - सदाभाऊ खोत यांची भूमातेला प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज त्यांच्या जन्मगावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे शेतीचे पुजन केले. आंब्याच्या पानांचे तोरण बांधत काळ्या आईबद्दल ऋण व्यक्त केले. धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी, राज्यातील बळीराजा सुखी समाधानी होऊ दे, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी श्री. खोत यांनी केली.

बेंदूरानिमित्त मंत्री खोत हे आज आपल्या व्यस्त दिनक्रमातून गावी आले होते. दुपारी त्यांनी कुटुंबियां समवेत त्यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी सपत्नीक शेतीचे पूजन केले. ग्रामीण भागात बेंदरादिवशी शेतात आंब्याच्या पानांचे तोरण, गोंडा बांधून भूमातेला पोळ्याचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे. 

या सणामुळे धन धान्याची व धनाची समृद्धी होते. महाराष्ट्रात बेंदूर या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात धन –धान्याची व धनाची समृद्धी यावी आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी राहावा, अशी प्रार्थना काळ्या आईच्या चरणी त्यांनी केली.

यावेळी सौ. सुमन खोत, युवानेते सागर खोत, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील, प्रशांत पाटील, शशीकांत शेळके, कृषी अधिकारी किरण बामणे, संदीप फार्ने आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sadabahu Khot worship agriculture land on Bendur festival