हातकणंगले लोकसभेसाठी मी स्वतः तयार - सदाभाऊ खोत

हातकणंगले लोकसभेसाठी मी स्वतः तयार - सदाभाऊ खोत

सांगली - "मी राज्यात मंत्री असलो तरी इथेच राहण्याची इच्छा नाही. मला दिल्लीत जाऊन काम करायचे आहे. तेथेच शेतकरी आणि तळागाळातील माणसांविषयीचे धोरण ठरवले आहेत. त्यामुळे मी हातकणंगले मतदार संघ रयत क्रांती संघटनेला मागतोय आणि मी स्वतः तेथून लढण्यास तयार आहे', अशी भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप - शिवसेनेची युती झाली आहे. त्यात भाजपला 25 तर सेनेला 23 जागा देण्यात आल्या आहेत. यामध्ये रिपाई, रासप आणि सदाभाऊंच्या रयत या घटकपक्षांना जागा मिळालेली नाही. त्यामुळे सदाभाऊंनी हातकणंगलेवर दावा केला आहे.

ते म्हणाले, ""मी विधान परिषदेत आहे, मंत्री आहे, मात्र मला लोकसभा लढवायची आहे. मी माढ्यातून लढलो होतो. निवडणूक लढल्यानंतर लोकसंपर्क वाढतो. नेटवर्क बांधता येते. एक मतदार संघ घेऊन तेथे स्वतंत्रपणे बांधणी करणे असेल किंवा एक मॉडेल मतदार संघाची निर्मिती असेल ती फायद्याची ठरते. त्यासाठी मी आग्रही भूमिका घेतली आहे. देशाचे धोरण दिल्लीत ठरते, राज्यात त्याची अंमलबजावणी होते. दिल्लीत जाण्याची भूमिका घेण्यामागे ते प्रमुख कारण आहे. मी माढ्यातून लढलो तेही त्यासाठीच.'' 

लोकसभेला जागा मिळाला नाही तर काय? या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""या घडीला त्याचा विचार केलेला नाही. कारण, भाजपने आमच्याबाबत चांगली भूमिका घेतलेली नाही. त्यांच्यावर मी नाराज नाही. भविष्यात विधानसभेला काय करायचे हे त्या-त्या वेळी ठरेल.'' 

आठवलेंना भेटणार 
केंद्रीय मंत्री, रिपाइंचे नेते रामदार आठवले यांनी सदाभाऊ खोत यांना सोमवारी भेटण्यासाठी बोलावले आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. त्यात लोकसभा निवडणुकीवर चर्चा होईल, मात्र यामध्ये नाराजीचा कुठलाही प्रश्‍न नाही, असे श्री. खोत यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com