सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला अपघात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. याच्या प्रचारासाठी तवेरा गाडीतून त्यांचे कुटुंबीय जात असताना आष्टा येथे गाडी पलटी झाली.

सांगली - राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कुटुंबियांच्या गाडीला आज (रविवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातात त्यांची सून जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहे. याच्या प्रचारासाठी तवेरा गाडीतून त्यांचे कुटुंबीय जात असताना आष्टा येथे गाडी पलटी झाली. या अपघातात खोत यांच्या सुनेसह दहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आली असताना सदाभाऊ खोत यांचे कुटुंबीय प्रचारात उतरले आहेत. 

Web Title: Sadabhau Khot family's car accident