वाळू ठेकेदार, माफियांची सत्ता नेस्तनाबूत करा  - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

इस्लामपूर - गेल्या पंधरा वर्षांत सत्तेच्या माध्यमातून विरोधकांनी कृष्णाकाठ ओरबाडून खाणारे वाळू ठेकेदार, माफिया निर्माण केलेत. त्यांना निवडणुकीत फक्‍त सामान्यांची आठवण येते. अशा लोकांची सत्ता नेस्तनाबूत करा. इस्लामपूर पालिकेप्रमाणे बागणी आणि वाळवा तालुक्‍यात सत्तांतर करा, असे आवाहन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. 

कारंदवाडी, मर्दवाडी, बागणी येथे प्रचारसभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. मंत्री खोत म्हणाले, ""सागर खोत यांची तगडी उमेदवारी आणि रयत विकास आघाडीच्या प्रचारामुळे आमचे पारडे जड झाले आहे. वाळव्यात यंदा परिवर्तन करायचंच असा सर्वांचा सूर आहे. बाजार समितीत जनावरांच्या बाजारासाठी असणारी मोठी जागा विरोधक आणि त्यांच्या बगलबचच्यांनी हडप करून प्लॉट पाडून विकले. त्याचा सविस्तर अहवाल मागून घेतला. निवडणुकीनंतर त्यांचा शोध घेऊन तुरुंगात धाडणार आहे.'' 

""शेतकऱ्यांसाठी मंत्रालयात आठवडे बाजार भरवले. बाजार समित्या आडतमुक्‍त केल्या. वाघवाडीजवळ कृषी महाविद्यालय सुरू होतंय. पांडूमास्तरांच्या स्मारकासाठी सव्वा दोन कोटी मंजूर केलेत. हे मी पाच महिन्यात केलं, गेली तीस वर्षे तुम्ही सत्तेत आहात नेमकं काय केलं ते जनतेला सांगा.बागणीचा चेहरामोहरा बदलू. सागर खोत, सचिन सावंत आणि मनीषा गावडे हे सदस्य त्यात लक्ष घालतील. बागणीत मला कुणाची जिरवायची नाही, मला फक्‍त विकास करायचाय. जनतेने आमच्यासोबत राहावे. आमच्यावर घराणेशाहीची टीका होत आहे. मग कासेगाव नेर्ले आणि रेठरेधरण येथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ते लागू होत नाही काय?'' उमेदवार सागर खोत, सचिन सावंत, मनीषा गावडे यांच्यासह संतोष घनवट, दि. बा. पाटील, नगरसेवक कोमल बनसोडे, अरुण कांबळे, अमित ओसवाल उपस्थित होते.

Web Title: sadhabhau khot islampur rally