सांगलीत 'यिन'कडून तरुणाईला 'सेफ्टी ड्राईव्ह'चा संदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

सांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्या, अशी साद घालत "यिन' व "यिनबझ'तर्फे सेफ्टी ड्राईव्हचा संदेश देण्यात आला. "सकाळ माध्यम समूह' व सांगली पोलिसांच्या वाहतूक शाखा यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम आज राबविण्यात आला. यावेळी तरुणांना गुलाबपुष्प देऊन सुरक्षा नियमांचे पालन करा, असे आवाहन करण्यात आले.

स्वामी विवेकानंद जयंतीदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम पुष्पराज चौकात आणि कॉलेज कॉर्नर येथे राबवण्यात आला. पुष्पराज चौकात वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम, "सकाळ'चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, सहयोगी संपादक शेखर जोशी यांच्या हस्ते युवकांना गुलाबपुष्प देऊन युवकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच वाहतूक नियम असलेले माहितीपत्र देऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) उदय देशपांडे, "ऍग्रोवन'चे व्यवस्थापक शीतल मासाळ, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी, विष्णू बंडगर उपस्थित होते. 

यिन सदस्यांनी यावेळी बाईकवरून जाणाऱ्या युवकांना गुलाबपुष्प आणि वाहतूक नियमाचे माहितीपत्र वाटप केले. या उपक्रमाचे युवकांनी स्वागत करत चांगला प्रतिसाद दिला. पुष्पराज चौकासह कॉलेज कॉर्नर येथेही यिन सदस्यांनी हा उपक्रम राबवला. यामध्ये "यिन'चे राज्याध्यक्ष इंद्रजित मोळे, पोर्णिमा उपळावीकर, प्राजक्ता माळी, कोमल जंबगी, निकिता खिचडे, अनुराधा चव्हाण, लक्ष्मी भिसे, वैष्णवी आवळे, सानिका शेंडगे, नेहा पवार, चैतन्या फडके, निखिल मोहिते, शुभम जमदाडे, दीपराज ठोंबरे, रोहन हारुगडे, अनिकेत हंकारे, धनंजय गायकवाड, तेजस पवार, आरती कोरेगावे सहभागी झाले होते. यिनचे जिल्हा समन्वयक विवेक पवार यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Safety Drive Messages from YIN in Sangli